'ही' वादग्रस्त अभिनेत्री साकारणार जयललितांची भूमिका

'ही' वादग्रस्त अभिनेत्री साकारणार जयललितांची भूमिका

आता राजकारणातल्या एका दिग्गज नेत्यावर सिनेमा येतोय. त्या आहेत जयललिता.जयललितांची भूमिकेसाठी अभिनेत्रीचं नाव नक्की झालंय.

  • Share this:

मुंबई, 23 मार्च : सध्या बाॅलिवूडमध्ये बायोपिकची हवा आहे. एकापाठोपाठ बायोपिक येतायत आणि हिटही होतायत. अलिकडेच ठाकरे आणि राणी लक्ष्मीबाई रिलीज झाले आणि ते चाललेही. आता राजकारणातल्या एका दिग्गज नेत्यावर सिनेमा येतोय. त्या आहेत जयललिता.

जयललितांची भूमिकेसाठी अभिनेत्रीचं नाव फायनल झालंय. अभिनेत्री कंगना राणौत जयललितांच्या भूमिकेसाठी निवडली गेलीय. कंगना राणौतचं मणिकर्णिकामधल्या राणी लक्ष्मीबाईंच्या भूमिकेसाठी कौतुक झालं होतं. आता कंगना दुसरी आव्हानात्मक भूमिका साकारायला सज्ज झालीय.

ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्शनं सोशल मीडियावर याची घोषणा केलीय. त्यांनी ट्विट केलंय. हा सिनेमा तामिळ आणि हिंदीत रिलीज होईल. दिग्दर्शन एएल विजय यांचं आहे.जयललिता यांचं 2016मध्ये निधन झालं. जयललिता स्वत: तेलगू, कन्नड सिनेमात काम करायच्या. आपल्या अभिनयानं रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या जयललिता 1991 ते 2016 पर्यंत तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या.

बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. रील लाईफप्रमाणेच रिअल लाईफमध्येही कंगना तितकीच बेधडकपणे वागते. न्यूज इंडियाच्या रायझिंग समिट 2018 मध्ये आलेल्या कंगणाने तिच्या स्वभावाची एक झलक दाखवून दिली. यावेळी कंगणाने तिचे राजकारणाबद्दलचे विचारही मांडले.

कंगनाने म्हटले की, नॅशनलिस्ट होण्यात आणि फंडामेंटलिस्ट होण्यात फरक असतो. माझा धर्मावर विश्वास नाही, जो माझा देश आहे तिथेच मी आहे. आपल्या देशाबद्दल लाज का वाटावी? जर अमेरिका त्यांच्या राष्ट्रगीतासाठी एकत्र उभा राहत असेल तर आम्ही का नाही होऊ शकत? देशाबद्दलचं वाईट बोलणं अनेकजण सहज घेतात. तरुण पिढी सातत्याने तक्रार करते. देश घाण असेल तर तुम्ही पाहुणे आहात का? साफ करा असंही कंगनाने सांगितले.


VIDEO: 'शिवज्योत' घेऊन धावले अमोल कोल्हे; म्हणाले.. 'हा जोश असाच टिकणार'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 23, 2019 01:27 PM IST

ताज्या बातम्या