S M L

रेखाच्या बदलत्या लूकची बाॅलिवूडमध्ये चर्चा

अचानक रेखाचा बदलता लूक पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसलाय.

Sonali Deshpande | Updated On: Feb 6, 2018 09:07 PM IST

रेखाच्या बदलत्या लूकची बाॅलिवूडमध्ये चर्चा

06 फेब्रुवारी : भरजरी सिल्कची साडी, त्यावर मॅचिंग दागिने, कपाळावर मोठी टिकली आणि भांगेत कुंकू अशीच बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री रेखाची स्टाइल आहे. पण अचानक रेखाचा बदलता लूक पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसलाय.

नुकतीच रेखाने एका पार्टीला हजेरी लावली होती. याचदरम्यानचे तिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतायत. यामध्ये रेखाने सिल्व्हर कलरच्या रंगाची साडी नेसलीये, तर त्यावर मॅचिंग नेकपीस आणि डोळ्याला गॉगल लावलाय.

विशेष म्हणजे या फोटोमध्ये रेखाच्या कपाळावरील मोठी टिकली, भांगेतील कुंकू आणि हातात बांगड्याच गायब आहेत. रेखाच्या या बदलत्या लूकची सध्या बी-टाऊनमध्ये जोरदार चर्चा होताना दिसतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 6, 2018 09:07 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close