DDLJ साठी शाहरुखला नव्हे, तर चक्क 'या'हॉलिवूड अभिनेत्याला होती दिग्दर्शकाची पहिली पसंती

DDLJ अर्थातच ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ (Dilwale Dulhaniya Le Jayenge) या चित्रपटाने एक रेकॉर्ड सेट केला आहे.

DDLJ अर्थातच ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ (Dilwale Dulhaniya Le Jayenge) या चित्रपटाने एक रेकॉर्ड सेट केला आहे.

  • Share this:
    मुंबई, 12 जून-  DDLJ अर्थातच ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ (Dilwale Dulhaniya Le Jayenge)  या चित्रपटाने एक रेकॉर्ड सेट केला आहे. या चित्रपटाने प्रत्येक व्यक्तीच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. चित्रपटातील अनेक कलाकारांना एक नवी ओळख मिळवून दिली आहे. 22-23 वर्षानंतरसुद्धा हा चित्रपट तितक्याच आवडीने बघितला जातो, आणि त्यातील प्रत्येक सीन एन्जॉय केला जातो. राज आणि सिमरनची ही लव्हस्टोरी आजही प्रेक्षकांना भुरळ पाडते. मात्र या यशस्वी चित्रपटामागे असे अनेक किस्से आहेत, जे आपल्याला अजूनही माहिती नाहीत. त्यातीलचं एक किस्सा म्हणजे या चित्रपटातील राज या व्यक्तिरेखेसाठी दिग्दर्शकाची पहिली पसंत शाहरुख खान (Shahrukh Khan) नव्हे तर हॉलिवूड अभिनेता होता. वाटलं नं आश्चर्य? हो मात्र हे सत्य आहे. ज्यावेळी या चित्रपटासाठी ‘राज’ चा विचार करण्यात येत होता, तेव्हा दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांच्या मनामध्ये कोणताही बॉलिवूड अभिनेता नव्हे तर चक्क हॉलिवूड अभिनेत्याचा विचार सुरु होता. आदित्य चोप्रा या चित्रपटासाठी टॉम क्रूझला साईन करण्याचा विचार करत होते. आणि या चित्रपटासाठी नावसुद्धा ठरवण्यात आलं होतं, ‘द ब्रेव्ह हार्ट टेक वील ब्राइड’ असं हे नाव होतं. दिग्दर्शक म्हणून आदित्य चोप्रा यांचा हा पहिलाचं चित्रपट होता. त्यावेळी यश चोप्रा यांनी त्यांची समजूत काढली. आणि मग शाहरुख खानचं नाव या रोलसाठी पुढ आलं. (हे वाचा: ओळखली का कोण आहे ही चिमुकली? आज बॉलिवूडवर करते राज्य ) मात्र शाहरुखने हा चित्रपट इतक्या सहजासहजी स्वीकारला नव्हता. यासाठी आदित्यने 4 वेळा शाहरुखची भेट घेतली होती. आणि त्यानंतर शाहरुखने यासाठी होकार दिला होता. आणि या चित्रपटाने शाहरुखचं नशीबचं पालटून टाकलं. DDLJ हा त्याच्या आयुष्यातील सर्वात यशस्वी चित्रपट म्हणावा लागेल. शाहरुखनंतर या चित्रपटासाठी सैफ अली खानचा विचार करण्यात येणार होता. अजून एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हे नाव अभिनेत्री किरण खैर यांनी दिलं आहे.
    Published by:Aiman Desai
    First published: