मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

ड्रग्ज प्रकरणानंतर बाप-लेकीत दुरावा? साराच्या चौकशीनंतर सैफनं पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

ड्रग्ज प्रकरणानंतर बाप-लेकीत दुरावा? साराच्या चौकशीनंतर सैफनं पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

साराला नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने चौकशीसाठी बोलावल्यानंतर सैफ आणि साराच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला आहे, असे काही मीडिया अहवालात समोर आले होते.

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 07 ऑक्टोबर : अभिनेता सैफ अली खान चौथ्यांदा बाबा होणार आहे. सैफ आणि करीनाने काही दिवसांपूर्वी ही गोड बातमी दिली होती. याआधी सैफ सारा अली खान, इब्राइम आणि तैमुर अली खान यांचा पिता आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत सैफला असे विचारले गेले की, तो सारा-इब्राइमपेक्षा तैमुरला अधिक वेळ देतो याबाबत त्याला दोषी वाटते का. कारण सैफ, तैमूर आणि करिना मुंबईतील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये राहतात तर  सारा आणि इब्राहिम त्यांची आई अमृताबरोबर राहतात.

या प्रश्नावर उत्तर देताना सैफने त्याचे त्याच्या मुलांवर किती प्रेम आहे याबाबत सांगितले. सैफ म्हणाला की, 'मी त्यांच्यासाठी नेहमी असणार आहे.  माझ्या तिन्ही मुलांवर माझे खूप प्रेम आहे. हे खरे आहे की मी तैमूरबरोबर बराच वेळ घालवितो, पण माझा मोठा मुलगा इब्राहिम आणि माझी मुलगी सारा यांच्याशी मी नेहमी जोडलेला असतो. माझ्या मनात माझ्या तिन्ही मुलांसाठी एक वेगळी जागा आहे.  जर मला सारामुळे काही कारणास्तवर वाइट वाटते आहे तर तैमुरमुळे मला चांगले वाटणार नाही. तुम्हाला मुलं होतात तेव्हा तुम्ही प्रत्येकासाठी तुमचं मन विभागता. त्यांची वयं वेगवेगळी आहेत. प्रत्येकाशी वेगवेगळ्या पद्धतीने कनेक्टेड असणं गरजेचे आहे. मी इब्राहिम आणि साराबरोबर गप्पा मारू शकतो किंवा जेवायला जाऊ शकतो पण ते मला तैमुरबरोबर नाही करता येणार.' बॉलिवूड हंगामाशी बोलताना त्याने ही प्रतिक्रिया दिली.

(हे वाचा-29 दिवसांनंतर रिया चक्रवर्ती तुरुंगातून येणार बाहेर, या अटींवर जामीन मंजूर)

(हे वाचा-अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच! सीबीआयने AIIMS चा अहवाल केला मान्य)

सैफ आणि साराबाबत असे अहवाल समोर आले होते की, अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात समोर आलेल्या ड्रग कनेक्शनमध्ये साराला नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने चौकशीसाठी बोलावले होते आणि त्यानंतर सैफ आणि साराच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला आहे. सुशांत आणि सारा यांनी 'केदारनाथ’ या पहिल्या चित्रपटात एकत्र काम केले होते. सैफ आणि सुशांतने 'दिल बेचारा' या सुशांतच्या शेवटच्या  चित्रपटात छोटीशी भूमिका केली होती.

First published:

Tags: Saif Ali Khan, Sara ali khan, Sushant Singh Rajput