मुंबई, 10 ऑक्टोबर : बॉलिवूडमधील एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा (Rekha) यांचे अभिनय क्षेत्रातील स्थान कुणीही घेऊ शकत नाही. त्यांनी केवळ त्यांच्या अभिनयानेच नव्हे तर नृत्य आणि अदांनी देखील अनेक दशकं प्रेक्षकांना घायाळ केले आहे. आजही अनेक अभिनेत्री रेखा यांच्यासारखे बोलण्याचा-वागण्याचा प्रयत्न करतात. पण रेखा यांची सर कुणालाच नाही. आज रेखा 66वा वाढदिवस साजरा करत आहेत. या अभिनेत्रीने साठी पार केली आहे, असे सांगूनही अनेकांना विश्वास बसणार नाही. म्हणूनच रेखा यांना एव्हरग्रीन म्हटले जाते यात वाद नाही. रेखा यांच्या आयुष्यातील अनेक चढउतार प्रेक्षकांसमोर आले आहेत. त्यांचे वैयक्तिक आयुष्य बऱ्याचदा चर्चेत राहिले आहे. रेखा यांच्याबद्दल बोलताना महानायक अमिताभ बच्चन यांचे नाव आले नाही तर नवल. ही जोडी पडद्यावरील अभिनयासाठी ज्याप्रमाणे चर्चेत होती, त्याचप्रमाणे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची देखील चर्चा झाली.
अभिनेत्री रेखा (Rekha) यांची अभिनयातील कारकिर्द अत्यंत यशस्वी आहे मात्र वैयक्तिक आयुष्यात त्यांना अनेक वळणावर अपयश सहन करावे लागले होते. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रेखा यांच्यातील नातेसंबंध हा देखील बॉलिवूडमधील एक चर्चेचा विषय बनला होता. या दोघांचे नाव जरी एकमेकांशी जोडले गेले होते, तरी दोन्ही कलाकारांनी कधीच उघडपणे त्यांच्या नात्याविषयी भाष्य केले नाही. जगासमोर त्यांनी त्यांच्या नात्याला प्रेमाचे नाव दिले नाही. मात्र एकदा एका व्यक्तीने रेखा यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टिप्पणी केली होती, त्यावेळी अमिताभ यांनी रागाच्या भरात त्या व्यक्तीला सर्वांसमोर जोरदार मारले होते.
(हे वाचा-बॉलिवूड सोडण्याआधी असा होता सना खानचा लुक, व्हायरल होत आहेत BOLD PHOTOS)
यासिर उस्मान यांनी लिहलेल्या 'रेखा- द अनटोल्ड स्टोरी' या पुस्तकात या घटनेचा उल्लेख करण्यात आला आहे. 1977 मध्ये रेखा आणि अमिताभ 'गंगा की सौगंध (Ganga Ki Saugand)' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी जयपूरमध्ये होते. तेव्हा या दोघांना पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी झाली होती. यामध्ये असणाऱ्या एका व्यक्तीने रेखा यांच्यावर कमेंट्स करायला सुरुवात केली. त्याला सांगूनही तो ऐकला नाही, तेव्हा अमिताभ यांनी त्या इसमाला पकडलं आणि सर्वांसमोर त्याला मारहाण केली. या घटनेनंतर रेखा-अमिताभ यांच्या नात्याची चर्चा सर्वाधिक रंगली. जया बच्चन यांच्यापर्यंत देखील ही संपूर्ण घटना पोहोचली होती.
(हे वाचा-'माझी आजी खालच्या जातीतील होती, आजही समाजाने आम्हाला स्वीकारलं नाही')
रेखा आणि अमिताभ बच्चन यांनी काही हिट सिनेमे केले आहेत. त्यांनी 1976 मध्ये त्यांनी 'दो अंजाने' मध्ये एकत्र काम केले होते. त्याशिवाय नटवरलाल, मुकद्दर का सिकंदर, गंगा की सौगंध आणि सिलसिला मध्येही ही जोडी एकत्र दिसली होती. त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीचे चाहते आजही आहेत.