अनुष्काचा ओरडा खाणाऱ्यानं केलंय शाहरुखसोबत काम!

अनुष्काचा ओरडा खाणाऱ्यानं केलंय शाहरुखसोबत काम!

हा अरहान आहे 90च्या शतकातला बालकलाकार. काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर त्यानं आपला एक फोटो शेअर केलेला. शाहरूख खान आणि सोनाली बेंद्रे यांच्या 'इंग्लिश बाबू देसी मेम'मध्ये त्यानं काम केलेला फोटो होता.

  • Share this:

मुंबई, 19 जून : अनुष्का शर्मा कारमधून कचरा फेकणाऱ्याला ओरडते काय, विराट त्याचा व्हिडिओ काढून पोस्ट करतो काय आणि याला तो अरहान फेसबुकवर उत्तर देतो काय! पण तो अरहान कोण आहे, याचा शोध लागलाय. वाचून तुम्हाला धक्काच बसेल, हा अरहान आहे 90च्या शतकातला बालकलाकार. काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर त्यानं आपला एक फोटो शेअर केलेला. शाहरूख खान आणि सोनाली बेंद्रे यांच्या 'इंग्लिश बाबू देसी मेम'मध्ये त्यानं काम केलेला फोटो होता.

अरहानचं स्क्रीनवरचं नाव सन्नी सिंग होतं. त्यानं माधुरी दीक्षितच्या बेटामध्येही काम केलं होतं. टीव्हीवर गाजलेल्या देख भाई देख मालिकेत त्यानं काम केलं होतं. शाहीद कपूरच्या पाठशाळामध्येही तो होता.

अनुष्कामुळे तो पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला.  क्रिकेटर विराट कोहलीनं आपली पत्नी अनुष्का शर्माचा एक व्हिडिओ शेअर केला होता. यात कारमधून रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या तरुणाला अनुष्काने फटकारून काढलं. हा तरुण कारमधून रस्त्यावर कचरा फेकत होता, त्याला पाहताच कार थांबवून "तुम्ही रस्त्यावर कचरा का फेकताय, यापुढे लक्षात ठेवा रस्त्यावर असा कचरा फेकू नका" असं अनुष्काने सुनावलंय.  त्याच अरहाननं फेसबुकवरून याला उत्तरही दिलं.

First published: June 19, 2018, 4:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading