मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

ज्येष्ठ अभिनेत्री बेगम फर्रुख जाफर यांचं निधन; अमिताभ यांच्या'गुलाबो-सीताबो'मध्ये शेवटचं केलं होतं काम

ज्येष्ठ अभिनेत्री बेगम फर्रुख जाफर यांचं निधन; अमिताभ यांच्या'गुलाबो-सीताबो'मध्ये शेवटचं केलं होतं काम

बेगम फारुख जाफरची अभिनय कारकीर्द 1981 साली सुरू झाली होत. त्यांनी 'उमराव जान' चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्री रेखाच्या आईची भूमिका साकारली होती.

बेगम फारुख जाफरची अभिनय कारकीर्द 1981 साली सुरू झाली होत. त्यांनी 'उमराव जान' चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्री रेखाच्या आईची भूमिका साकारली होती.

बेगम फारुख जाफरची अभिनय कारकीर्द 1981 साली सुरू झाली होत. त्यांनी 'उमराव जान' चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्री रेखाच्या आईची भूमिका साकारली होती.

  • Published by:  Aiman Desai
मुंबई, 16ऑक्टोबर- हिंदी चित्रपटसृष्टीतील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री बेगम फारुख जाफर(Begum Farkha Jafuure Death) यांचं शुक्रवारी निधन झालं. त्यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी लखनौमध्ये शेवटचा श्वास घेतला. बेगम फारुख जाफरने रेखा स्टारर चित्रपट 'उमराव जान' पासून अमिताभ बच्चन स्टारर 'गुलाबो सिताबो' पर्यंत अनेक सुंदर भूमिका साकारून आपली ओळख निर्माण केली होती. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणारआहे. अभिनेत्री बेगम फारुख जाफरच्या निधनाची बातमी त्यांचा नातू शाज अहमद याने दिली आहे. त्याने सांगितलं की, त्याच्या आजीचे शुक्रवारी (15 ऑक्टोबर) गोमतीनगरच्या निवासस्थानी ब्रेन स्ट्रोकमुळे निधन झालं आहे. शाज अहमदने सांगितलं की, शनिवारी सकाळी 10 वाजता त्यांच्यावर ऐशबाग येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. ब्रेन स्ट्रोकने निधन- बेगम फारुख जाफर यांना 5 ऑक्टोबर रोजी लखनऊच्या सहारा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना ब्रेन स्ट्रोक झाला होता. तसेच हॉस्पिटलायझेशन दरम्यान त्यांच्या फुफ्फुसात इन्फेक्शनही झालं होतं. यासह, त्यांना श्वास घेण्यात अडचण, थंड-सर्दी यासारख्या विविध समस्यांशी त्या झुंज देत होत्या. रेडिओ जॉकी म्हणून केली होती कारकिर्दीची सुरुवात- फारुख जाफर यांनी रेडिओ जॉकी म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यांचा 'गीत भरी कहानी' नावाचा कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय होता, ज्यामध्ये त्या गाण्यांच्या दरम्यान मध्ये सांगितल्या जाणाऱ्या कथांना आपला आवाज देत असत. तसेच त्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये संध्याकाळी क्लास करत असत. रेखासोबत केली होती अभिन्यास सुरुवात- बेगम फारुख जाफरची अभिनय कारकीर्द 1981 साली सुरू झाली होत. त्यांनी 'उमराव जान' चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्री रेखाच्या आईची भूमिका साकारली होती. याशिवाय त्यांनी 'स्वदेश', 'सुलतान', 'सिक्रेट सुपरस्टार' आणि 'पीपली लाईव्ह' यासह अनेक चित्रपटांमध्ये आपल्या व्यक्तिरेखेने लोकांची मने जिंकली आहेत. अमिताभ बच्चन यांच्या 'गुलाबो सीताबो' या चित्रपटात त्या शेवटच्या दिसल्या होत्या. या चित्रपटात त्यांनी फातिमा बेगमची भूमिका साकारली होती. तसेच फारुख यांचे लग्न स्वातंत्र्य सेनानी आणि उत्तर प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी विधान परिषद सदस्य एस एम जाफर यांच्याशी झाले होते. मेहरुनिन्सामध्ये तिचे पात्र जगणाऱ्या बेगम यांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
First published:

Tags: Bollywood, Entertainment

पुढील बातम्या