गोव्याच्या 'क्लब्स'मध्ये विकलं जातंय 'या' बोल्ड अभिनेत्रीच्या नावाने ड्रिंक्स

गोव्याच्या 'क्लब्स'मध्ये विकलं जातंय 'या' बोल्ड अभिनेत्रीच्या नावाने ड्रिंक्स

आपल्या नावाचं ड्रिंक्स गोव्याच्या क्लब्समध्ये विकलं जातंय हे जेव्हा तिला कळलं तेव्हा तिची प्रतिक्रीया काय राहील याची सगळ्यांनाच उत्सुकता होती.

  • Share this:

पणजी 30 ऑक्टोंबर : बॉलिवुडची अभिनेत्री उर्वशी रौतेला आपल्या 'बोल्ड' अदांसाठी प्रसिद्ध आहे. तिच्या बिनधास्त अदांमुळे ती कायम चर्चेत असते. आता आणखी एका गोष्टीमुळे ती चर्चेत आलीय. ती गोष्टही खास आहे. कारण गोव्यांच्या क्लब्समध्ये उर्वशीच्या नावाने एक ड्रिंक्स विकलं जातंय. त्या ड्रिंक्सचं नाव आहे 'उर्वशी रौतेला शॉट'. गोव्यात सध्या थर्टी फस्टची तयारी सुरू आहे. सगळी हॉटेल्स त्यासाठी सज्ज होत आहेत. अशा वातावरणात हे ड्रिंक्स बाजारात  आणण्यात आलं असून तरुणांची या उर्वशी ड्रिंक्सला पंसती मिळेल अशीही अशा व्यक्त केली जातेय.आपल्या नावाचं ड्रिंक्स गोव्याच्या क्लब्समध्ये विकलं जातंय हे जेव्हा उर्वशीला कळलं तेव्हा तिची प्रतिक्रीया काय राहील याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. मात्र उर्वशीने जी प्रतिक्रिया दिली त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य झालं.

बिग बींच्या दिवाळी पार्टीत दुर्घटना, शाहरुखनं वाचवला ऐश्वर्याच्या मॅनेजरचा जीव!

उर्वशी म्हणाली, माझ्या नावाचं ड्रिंक्स विकलं जातंय हे  कळल्यावर मला त्याचा आनंद झालाय. गोव्याच्या क्लब्समध्ये हे जे काय सुरू आहे त्यामुळे मला फायदाच होणार आहे. असं काही करण्याआधी त्या लोकांनी नक्कीच विचार केला असणार.अशा ड्रिंक्सला उर्वशीचं नाव का दिलं असा प्रश्न गोव्यातल्या क्लब्स मालकांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांचं उत्तरही तेवढच बोल्ड आहे. ते म्हणाले, अशा पद्धतीच्या गोष्टींना उर्वशी सकारात्मक घेईल अशी आम्हाला आशा आहे. तिची नकारात्मक प्रतिक्रिया येणार नाही असं वाटल्यानेच आम्ही उर्वशीचं नाव दिलं.

बॉलिवूडच्या मस्तानीनं नाकारलेले सलमानचे हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर ठरले सुपरहिट

अशा प्रकारच्या ड्रिंक्सला तिच्याशिवाय दुसऱ्या कुठल्याचं अभिनेत्रीचं नावं दिलं जावू शकत नाही. त्यामुळे आम्ही उर्वशीच्यात नावाचा विचार केला. एखाद्या बॉलिवूड कलाकाराच्या नावाने गोव्याच्या क्लब्समध्ये ड्रिंक्स विकलं जायची ही काही पहिलीच वेळ नाहीय. या आधीही 'वन्स अपॉन टाइम इन मुंबई दोबारा' या चित्रपटातल्या शोएब या कलाकाराच्या नावानेही एक कॉकटेल ड्रिंक्स गोव्यात दिलं जात होतं. 'फुकरे' या चित्रपटातल्या 'भोली पंजाबन' भूमिकेवरूनही असंच एका कॉकटेल ड्रिंक्सने गोव्यात धम्माल केली होती.

First published: October 30, 2019, 9:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading