मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

ओळखलं का बॉलिवूडच्या या दोन 'लेडी सिंघम' ना? कलाकरांना आपल्या तालावर नाचवण्यात आहेत एक्स्पर्ट

ओळखलं का बॉलिवूडच्या या दोन 'लेडी सिंघम' ना? कलाकरांना आपल्या तालावर नाचवण्यात आहेत एक्स्पर्ट

बॉलिवूड   (Bollywood)   कलाकार त्यांचे जुने फोटो   ( Bollywood Throwback Photo)  पाहून जुन्या आठवणींमध्ये हरवून जातात. अनेकवेळा असे घडते की काळानुसार एखाद्या व्यक्तीच्या दिसण्यात आणि व्यक्तिमत्त्वात मोठा बदल घडून येतो. त्यामुळे काही वर्षांनंतर त्यांना ओळखणं कठीण होऊन बसतं. असंच काहीसं घडलं, जेव्हा या बॉलिवूड सेलिब्रिटींचे थ्रोबॅक फोटो समोर आले.

पुढे वाचा ...
  • Published by:  Aiman Desai

 मुंबई, 22 डिसेंबर-   बॉलिवूड   (Bollywood)   कलाकार त्यांचे जुने फोटो   ( Bollywood Throwback Photo)  पाहून जुन्या आठवणींमध्ये हरवून जातात. अनेकवेळा असे घडते की काळानुसार एखाद्या व्यक्तीच्या दिसण्यात आणि व्यक्तिमत्त्वात मोठा बदल घडून येतो. त्यामुळे काही वर्षांनंतर त्यांना ओळखणं कठीण होऊन बसतं. असंच काहीसं घडलं, जेव्हा या बॉलिवूड सेलिब्रिटींचे थ्रोबॅक फोटो समोर आले. या दोघीही एकाच क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी अनेक मोठमोठ्या कलाकरांना आपल्या तालावर नाचवलं आहे.

तुम्हाला अजूनही ओळखता आलं नसेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की, हा थ्रोबॅक फोटो बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान (Farah Khan)   आणि गीता कपूर   (Geeta Kapoor)  यांचा आहे.या दोघींना पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटलं ना? कारण आज या दोघींच्या व्यक्तिमत्त्वात इतका फरक पडला आहे की त्यांना ओळखणं सोपं नाही. या दोघींमध्ये सुरुवातीपासूनच खूप सुंदर नातं आहे. या फोटोत दोघीही खूप स्लिम दिसत आहेत. हा त्या काळातील फोटो आहे जेव्हा दोघीही अगदी लहान होत्या. आणि या क्षेत्रात अतिशय नवख्या होत्या. हा फोटो मुंबईतील चांदिवली स्टुडिओमध्ये घेण्यात आला आहे.

गीता कपूरने फराह खानसोबत असिस्टंट डान्सर म्हणून काम करायला सुरुवात केली होती. त्यावेळी गीता फक्त 15 वर्षांची होती. गीताने 'तुझे याद ना मेरी आई' सारख्या अनेक गाण्यांमध्ये बॅकग्राउंड डान्सरचे काम केलं आहे. हळूहळू तिनं फराहला मदत करायला सुरुवात केली. 'दिल तो पागल है', 'कभी खुशी कभी गम' आणि 'ओम शांती ओम'मध्ये ती फराहची असिस्टंट कोरिओग्राफर होती. हळूहळू गीता स्वतः कोरिओग्राफी करू लागली. 'फिजा', 'साथिया', 'हे बेबी', 'शीला की जवानी' यांसारख्या अनेक गाण्यांची उत्कृष्ट कोरियोग्राफी करून गीता कपूरने बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

(हे वाचा:Justin Bieber च्या गाण्यावर Alia Bhatt चा देसी डान्स; जबरदस्त VIDEO VIRAL)

तर दुसरीकडे फराह खान कोरियोग्राफरसोबतच फिल्ममेकरही बनली आहे. फराहने एकदा मीडियाला सांगितलं होतं की, गीता इतकी तरुण आणि सुंदर होत की तिच्या चित्रपटातील कलाकार डान्स करताना गीता कपूरवर लाईन मारत असत.गीता कपूर आणि फराह खान यांच्या वयात फारसं अंतर नाही परंतु तरीही गीता प्रेमाने आणि आदराने फराहला 'मां' म्हणजेच आई म्हणते. तर आज संपूर्ण देश स्वतः गीताला गीता कपूर नव्हे तर 'गीता मां' म्हणत. गीता कपूरने एका मुलाखतीत सांगितलं होतं कि, जेव्हा मी कोणत्याही कामासाठी, शूटिंगसाठी किंवा कार्यक्रमासाठी जायचो तेव्हा माझी आई माझ्यासोबत फिरत असे. परंतु जेव्हा मी फराह खानसोबत काम करायला सुरुवात केली तेव्हा आम्ही अनेक परदेशी दौऱ्यांवर जात असू. त्यावेळी माझी आई माझ्यासोबत प्रवास करू शकत नव्हती. आणि त्यावेळी फराह माझी आईसारखी काळजी घेत असे. म्हणूनच मी तिला मनापासून 'मां' अर्थातच आई म्हणू लागलो.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment