• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Raj Kundra Case: पतीच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी पहिल्यांदाच करणार FB LIVE

Raj Kundra Case: पतीच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी पहिल्यांदाच करणार FB LIVE

अभिनेत्री शिल्पा शेट्टी 15 ऑगस्ट रोजी फेसबुक लाइव्ह करणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 10 ऑगस्ट- बॉलिवूडची (Bollywood) फिटनेस क्वीन शिल्पा शेट्टीच्या (Shilpa Shetty) अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होतं आहे. पती राज कुंद्राच्या प्रकरणामध्ये (Raj Kundra Case) अजून कोणताही दिलासा मिळालेला नाही, तत्पूर्वीचं उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊमध्ये शिल्पा शेट्टी आणि तिची आई सुनंदावर कोट्यावधी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप लागला आहे. मात्र या सर्व आरोपांनंतरही शिल्पा शेट्टी चाहत्यांशी संवाद साधणार आहे. ती 15 ऑगस्ट रोजी फेसबुक लाइव्ह करणार आहे. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, शिल्पा शेट्टी ‘वी फॉर इंडिया’च्या माध्यमातून ‘गिव्ह फॉर इंडिया’ मध्ये सहभागी होणार आहे. यासाठी 15 ऑगस्ट हा दिवस निवडण्यात आला आहे. यामध्ये अनेक बॉलिवूड कलाकार कोरोना महामारीसाठी मदत करण्याचं आवाहन करताना दिसून येतील. यामधून मिळणाऱ्या निधीचा वापर ऑक्सिजन, मेडिसीन, व्हेंन्टलिटर, आयसीयू सुविधा तसेच कोरोना लसीकरणामध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. (हे वाचा:गोल्ड विनर नीरज चोप्राच्या वेट लॉस जर्नीने इम्प्रेस झाला अर्जुन कपूर ) शिल्पा शेट्टीसोबतचं या उपक्रमामध्ये बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर, अभिनेत्री विद्या बालन, परिणीती चोप्रा, सारा अली खान, दिया मिर्झा, करण जोहर, स्टीवन स्पीलबर्गसारखे अनेक कलाकार सहभागी होणार आहे. तसेच या सर्वांना ए.आर.रेहमान आणि एड शिरन यांची साथ मिळणार आहे. (हे वाचा: अखेर पवनदीपने अरुणीतासोबतच्या नात्यावर केला खुलासा;'Indian Idol 12'च्या मंचावर..) अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच शिल्पा शेट्टीवर आणि तिच्या आईवर वेलनेस सेंटर उघडण्याच्या नावावर कोट्यावधी रुपये घेतल्याचा आणि फसवणूक केल्याचा आरोप लागला आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: