Home /News /entertainment /

स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताच शिल्पा शेट्टी झाली ट्रोल; युजर्स म्हणाले...

स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताच शिल्पा शेट्टी झाली ट्रोल; युजर्स म्हणाले...

पतीच्या अटकेनंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टी सतत सोशल मीडियावर ट्रोल होतं आहे.

  मुंबई, 15 ऑगस्ट- बॉलिवूडची(Bollywood) फिटनेस क्वीन म्हणून अभिनेत्री शिल्पा शेट्टीला (Shilpa Shetty) ओळखलं जातं. अभिनय,फिटनेस आणि स्टाईलने शिल्पाने नेहमीचं चाहत्यांची मनं जिंकली आहेत. मात्र पती राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी चांगलीच अडचणीत सापडली आहे. शिल्पाचा पती राज कुंद्राला पोर्नोग्राफी (Raj Kundra Case) प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पतीच्या अटकेनंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टी सतत सोशल मीडियावर ट्रोल होतं आहे. नुकताच अभिनेत्रीने चाहत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या, शुभेच्छा देताचं शिल्पा पुन्हा एकदा ट्रोल(Trolle) होऊ लागली आहे.
  बॉलिवूडची योगा आणि फिटनेस क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. शिल्पाने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेयर करत चाहत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शिल्पाच्य या पोस्टनंतर तिचे चाहते तिलाही शुभेच्छा देऊ लागले. तसेच तिला धीरही देऊ लागले. मात्र काही युजर्स शिल्पाला ट्रोल करू लागले आहेत. शिल्पाच्या पोस्टवर एका युजर्सने कमेंट करत म्हटलं आहे, ‘तिकडे मुलींचे पॉर्न बनवणार आणि इकडे स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देणार, RIP लॉजिक’. तर एकाने कमेंट करत राज कुंद्रा कुठे आहे? असा प्रश्न केला आहे. तर आणखी एकाने राज कुंद्रा कधी सुटणार अशी कमेंट केली आहे. (हे वाचा: ब्रालेटनंतर कंगनाचा स्विमसूट अवतार; भाच्यासोबत स्विमिंगपूलमध्ये करतेय एन्जॉय) शिल्पा शेट्टीचा पती आणि उदयोगपती राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी 19 जुलै रोजी पोर्नोग्राफीच्या प्रकरणामध्ये अटक केली आहे. तसेच त्याच्याविरुद्ध भक्कम पुरावे असल्याचंदेखील म्हटलं आहे. या प्रकरणामध्ये अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्सनी धक्कादायक खुलासे केल्यामुळे राज कुंद्रा प्रकरण खूपच गंभीर बनलं आहे. तर दुसरीकडे पतीच्या अटकेमुळे शिल्पा शेट्टीला ट्रोल केलं जातं आहे. शिल्पा शेट्टीने ‘सुपर डान्सर’ या शोमधून सुद्धा काढता पाय घेतला आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Raj kundra, Shilpa shetty

  पुढील बातम्या