बॉलिवूडची पहिली स्टंट वुमन, 'शोले' मध्ये हेमा मालिनींसाठी केला होता हा स्टंट

बॉलिवूडची पहिली स्टंट वुमन, 'शोले' मध्ये हेमा मालिनींसाठी केला होता हा स्टंट

५० वर्षांपूर्वी एका महिलेने स्टंट करणं तसं अशक्यप्रायच होतं. अशा वेळी रेश्मा यांचं स्टंट करणं हे खुप चर्चेचा विषय बनला होता. रेश्मा यांच्या वडिलांनाही आपल्या मुलीचं हे काम आवडत नव्हतं.

  • Share this:

मुंबई,11जानेवारी : स्टंट (Stunt)म्हटलं की आपल्यासमोर येतो एखाद्या हिरोचा चेहरा. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तानाजी चित्रपटातला अजय देवगणही आपल्या डोळ्यासमोर येईल. एकेकाळी स्टंट करणं ही केवळ पुरुषांची मक्तेदारी होती. पण अगदी ५० वर्षांपूर्वी एका महिलेने ही मक्तेदारी मोडून काढली होती. रेश्मा पठाण असं त्या जिगरबाज महिलेचं नाव आहे. शोले(Sholay)चित्रपटासोबतच अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या अभिनेत्रींसाठी रेश्मा यांनी स्टंट सीन दिलेले आहेत. स्टंट करण्याच्या करिअरमधून त्यांनी बॉलिवूडमध्ये आपली ओळख बनवली. शोले चित्रपटात हेमा मालीनीच्या टांग्यावर बसून टांगा पळवण्याच्या सीनमध्ये आपल्याला चित्रपटात जरी हेमा मालिनी दिसत असली तरी तो टांगा पळवण्याचा सीन रेश्मा यांनी केला आहे. टांगा जोरात पळवण्याच्या सीनमध्ये टांगा दगडाला धडकतो आणि तुटतो. या सीनवेळी रेश्मा खरोखर टांग्याच्या खाली आल्या होत्या.. या घटनेवेळी रेश्माचा जीव जाता जाता वाचला आहे.

पोटासाठी करावे लागले स्टंट

बॉलिवूडमधल्या अनेक चित्रपटांमध्ये रेश्मा यांनी स्टंट केले आहेत. रेश्मा स्टंट करण्यात इतक्या तरबेज आहेत की आजही स्टंटसाठी त्यांना फॉलो करणारे बरेचजण आहेत. टांगा गाडी चालवणं, घोडेस्वारी करणं, उंच इमारतीवरून खाली उडी मारणं, तलवार बाजी करणं, जीवघेणे फाइट सीन, दोरीवर चढून चालत्या गाडीवर उडी मारणं, वाघासोबत लढणं असे अनेक अवघड स्टंट त्यांनी केले आहेत.

रेश्मा यांच्या आयुष्यावर चित्रपट (The Sholay Girl)

रेश्मा यांनी त्यांच्या मुलाखतीत आपल्या स्टंट करिअरला 14 व्या वर्षी सुरुवात झाल्याचं सांगितलं. हे काम त्यांनी कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी सुरु केलं होतं. आज ६५ वर्षांच्या रेश्मा यांच्या प्रेरणादायी आयुष्यावर चित्रपट बनला आहे. 'द शोले गर्ल-रेश्मा पठान'('The Sholay Girl')असं या चित्रपटाचं नाव आहे. बिदिता बेग या अभिनेत्रीने या चित्रपटात रेश्मा यांची भूमिका साकारली आहे. बिदिता ने रेश्मा यांच्याकडून भूमिकेसाठी स्टंटचं ट्रेनिंग घेतलं.

अशक्य ते केलं शक्य केलं

५० वर्षांपूर्वी एका महिलेने स्टंट करणं तसं अशक्यप्रायच होतं. अशा वेळी रेश्मा यांचं स्टंट करणं हे खूप चर्चेचा विषय बनला होता. रेश्मा यांच्या वडिलांनाही आपल्या मुलीचं हे काम आवडत नव्हतं. वडिलांचं आजारपण आणि एकवेळच्या जेवणाची भ्रांत अशा परिस्थितीत काम कऱण्याशिवाय पर्याय नव्हता आणि या परिस्थितीतूनच रेश्मा यांनी आपलं काम सुरु ठेवलं. मी चुकीच्या कामातून नाही तर मेहनतीने पैसे मिळवत असल्याचं रेश्मा यांनी त्यांच्या वडिलांना समजावून सांगितलं आणि आज त्यांच्या प्रवासाबद्दल अनेकांना त्यांचा अभिमान वाटतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 11, 2020 07:12 PM IST

ताज्या बातम्या