मुंबई, 07 ऑक्टोबर: बॉलिवूडमध्ये (Bollywood) वर्षभरात हजारो चित्रपट बनतात. यातील काही थिएटरमध्ये प्रदर्शित होतात आणि प्रेक्षकांच्या पसंतीस देखील येतात. मात्र काही सिनेमांच्या प्रदर्शनावेळी एखादी अडचण आल्याने त्याचे प्रदर्शन लांबते. असाच काहीसा प्रकार बोनी कपूर यांच्या एका सिनेमाबाबतीत झाला आहे. पण थोडेथोडके नव्हे तर तब्बल 10 वर्षांनी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. 10 वर्षांपूर्वी हा सिनेमा बनून तयार होता, मात्र काही कारणास्तवर तो बॉक्स ऑफिस गाठू शकला नाही.
इट्स माय लाइफ (It's My Life) असं या सिनेमाचं नाव असून यामध्ये जेनेलिया डिसूझा (Genelia D'Souza) आणि हरमन बावेजा (Harman Baweja) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्याचप्रमाणे नाना पाटेकर (Nana Patekar) आणि कपिल शर्मा (Kapil Sharma) यांची देखील या सिनेमात महत्त्वाची भूमिका आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) प्रदर्शित होणार नसून थेट टेलिव्हिजनवर प्रदर्शित होणार आहे. याबाबत सिनेमाचे निर्माते बोनी कपूर यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. त्यांनी पोस्टर देखील शेअर केले आहे.
(हे वाचा-कोरोनाच्या भीतीमुळे या अभिनेत्रीने सोडला होता देश, 6 महिन्यांनी परतली भारतात)
This November, we're taking you all out on a fun ride with @zeecinema! Get ready for the trailer of a complete family entertainer, ‘It's My Life’, today at 12 noon. #ItsMyLifeOnZeeCinema #SanjayKapoor @BazmeeAnees @nanagpatekar #HarmanBaweja @geneliad @KapilSharmaK9 pic.twitter.com/LX3xWuFBXQ
— Boney Kapoor (@BoneyKapoor) November 5, 2020
हा सिनेमा 29 नोव्हेंबर रोजी झी सिनेमावर (Zee Cinema) प्रदर्शित होणार आहे. जेनेलियाने देखील या ट्वीटवर आनंद व्यक्त करत ही पोस्ट रीट्वीट केली आहे. हा सिनेमा तेलुगू चित्रपट Bommarillu चा हिंदी रिमेक आहे. मिड डे मधील बातमीनुसार या सिनेमामध्ये कुटुंबातील नातेसंबंधावर भाष्य करण्यात आले आहे. यामध्ये मुलगा आणि वडील यांच्यातील नाते दाखवण्यात आले आहे. हरमनच्या वडिलांची भूमिका नाना पाटेकर यांनी साकारली असून याचे दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केले होते.
(हे वाचा-करण-अर्जुन आएंगे! पुन्हा पाहायला मिळणार सलमान-शाहरुख जोडीची केमिस्ट्री)
अनीस बज्मी यांच्या मते या सिनेमा म्हणजे एक चांगली कॉमेडी असणार आहे. कोरोना काळात योग्य वेळी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. या सिनेमाचे शूटिंग 2007 मध्ये पूर्ण झाले होते.