मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'तान्हाजी' फेम इलाक्षी गुप्ताचं मराठीत पदार्पण; 'या'अभिनेत्यासोबत झळकणार

'तान्हाजी' फेम इलाक्षी गुप्ताचं मराठीत पदार्पण; 'या'अभिनेत्यासोबत झळकणार

अभिनेत्री इलाक्षी गुप्ताने ‘तान्हाजी’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल होतं. यामध्ये तिने ‘सोयराबाईंची’ व्यक्तिरेखा साकारली होती.

अभिनेत्री इलाक्षी गुप्ताने ‘तान्हाजी’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल होतं. यामध्ये तिने ‘सोयराबाईंची’ व्यक्तिरेखा साकारली होती.

अभिनेत्री इलाक्षी गुप्ताने ‘तान्हाजी’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल होतं. यामध्ये तिने ‘सोयराबाईंची’ व्यक्तिरेखा साकारली होती.

मुंबई, 7 जुलै- ‘तान्हाजी-द अनसंग वॉरियर’(Tanhaji: The Unsung Warrior) फेम अभिनेत्री(Actress) डॉ. इलाक्षी गुप्ता(Dr. Elakshi Gupta) लवकरच मराठीमध्ये झळकणार आहे. नुकताच इलाक्षीने पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. तिने सेटवरचे काही फोटोसुद्धा शेयर केले आहेत. इलाक्षी लवकरच ‘भ्रम’ या मराठी चित्रपटामध्ये दिसून येणार आहे.

अभिनेत्री इलाक्षी गुप्ताने ‘तान्हाजी’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल होतं. यामध्ये तिने ‘सोयराबाईंची’ व्यक्तिरेखा साकारली होती. तिच्या भूमिकेच कौतुकदेखील झालं होतं. पहिल्याच चित्रपटातून ती सर्वांच्या नजरेत आली होती. तसेच पहिल्याच चित्रपटात तिला अजय देवगन आणि काजोलसारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. यांनतर आत्ता इलाक्षीने चक्क मराठीकडे आपला मोर्चा वळवला आहे.

(हे वाचा: 'सई रे सही'; 'समांतर 2' साठी होतंय सई ताम्हणकरचं कौतुक)

इलाक्षी नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. या फोटोंना कॅप्शन देत तिने ‘भ्रम’ चित्रपटाचं शुटींग सुरु असल्याचं म्हटलं आहे. या चित्रपटामध्ये ती अभी आमकरसोबत दिसून येणार आहे. हा एक रहस्यमयी चित्रपट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन वैभव लोंढे यांनी केलं आहे. तान्हाजी या हिंदी चित्रपटानंतर इलाक्षी मराठीमध्येसुद्धा आपला ठसा उमठवण्यासाठी सज्ज झाली आहे.

(हे वाचा: VIDEO:तुम्हाला मोतीचूरचे लाडू बनवता येतात का?'; पाहा रुपाली शिकवतेय सोपी पद्धत )

तसेच लवकरच इलाक्षीचा अभिनेता श्रेयश तळपदेसोबत एक चित्रपट येणार आहे. हा एक हिंदी चित्रपट आहे. चित्रपटाचं शुटींगही पूर्ण झालं आहे. या चित्रपटाचं नाव ‘लव्ह यू शंकर’ असं आहे. यावरून हेच लक्षात येत की, इलाक्षी हिंदी आणि मराठी दोन्हीमध्ये सक्रीय आहे. इलाक्षी सोशल मीडियावरसुद्धा सक्रीय असते. ती सतत आपले विविध व्हिडीओ आणि फोटो चाहत्यांसाठी शेयर करत असते. इलाक्षीच्या अभिनय आणि सौंदर्यासोबतचं तिच्या फिटनेसचंदेखील विशेष कौतुक होतं. इलाक्षीला आत्ता मराठी रसिकांची कशी दाद मिळेल पाहणं औस्तुक्याचं ठरणार आहे.

First published:
top videos

    Tags: Marathi cinema, Marathi entertainment