ABCD फेम कोरिओग्राफर किशोर शेट्टीला अटक, ड्रग सप्लाय केल्याचा आरोप

ABCD फेम कोरिओग्राफर किशोर शेट्टीला अटक, ड्रग सप्लाय केल्याचा आरोप

किशोर शेट्टीने (Kishore Shetty) प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूजा यांचा सिनेमा ABCD मध्ये देखील काम केले आहे. त्याने रिअॅलिटी शो डान्स इंडिया डान्स मध्ये देखील सहभाग घेतला होता. ज्यामुळे तो चर्चेत आला आहे.

  • Share this:

मुंबई, 19 सप्टेंबर : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात (Sushant Singh Rajput Case)ड्रग अँगल समोर आल्याने एनसीबीकडून (Narcotics Control Bureau) कडून तपास सुरू आहे. तर दुसरीकडे मंगळुरू पोलिसांच्या गुन्हे शाखेने (CCB) शनिवारी ड्रग्ज प्रकरणात कोरिओग्राफर किशोर शेट्टीला अटक केली आहे. त्याच्यावर ड्रग्ज बाळगण्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी चौकशी सुरू आहे. किशोर शेट्टीने (Kishore Shetty) प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूजा यांचा सिनेमा ABCD मध्ये देखील काम केले आहे. त्याने रिअॅलिटी शो डान्स इंडिया डान्स मध्ये देखील सहभाग घेतला होता. ज्यामुळे तो चर्चेत आला होता.

मंगळुरू पोलीस विभागाच्या सूत्रांच्या माहितीनुसार तो मुंबईहून मंगळुरूमध्ये ड्रगची डिलीव्हरी करत होता. न्यू इंडियन एक्सप्रेसने  याबाबत बातमी दिली आहे. या अहवालानुसार किशोर शेट्टीविरोधात नार्कोटिक ड्रग अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स अॅक्ट (NDPS Act) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

(हे वाचा-'आम्ही एकाच गोष्टीसाठी लढतोय...', एक्स बॉयफ्रेंडने दिला कंगनाला पाठिंबा

मंगळुरू शहर पोलीस आयुक्त लवकरच याप्रकरणातील औपचारिकता पूर्ण झाल्यावर पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाबाबत पर्दाफाश करणार आहेत.

(हे वाचा-आमीरचा बॉडीगार्ड होता हा प्रसिद्ध अभिनेता,करावा लागला होता कठीण प्रसंगांचा सामना)

दरम्यान सुशांतच्या केसमधील ड्रग कनेक्शनमध्ये एनसीबीच्या गळाला आणखी एक मासा लागला आहे. एनसीबीने मुंबईहून ड्रग्स पेडलर राहिल विश्राम नावाच्या व्यक्तीला एक किलो चरससह ताब्यात घेतले आहे. झोनल डायरेक्टरनी याबाबत माहिती दिली आहे. त्याने हिमाचल प्रदेशातून चरस मागवल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: September 19, 2020, 3:22 PM IST
Tags:

ताज्या बातम्या