Home /News /entertainment /

VIDEO: सेल्फीसाठी विकी कौशलकडे त्याच्या चाहतीची मास्क काढण्यासाठी विनंती, अशी होती अभिनेत्याची Reaction

VIDEO: सेल्फीसाठी विकी कौशलकडे त्याच्या चाहतीची मास्क काढण्यासाठी विनंती, अशी होती अभिनेत्याची Reaction

अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) चा मास्क घालून बाहेर पडल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. मात्र त्याच्या अवतीभोवती असणाऱ्या चाहत्यांना आता यामुळे त्याच्याबरोबर फोटो काढणं अवघड झालं आहे.

  मुंबई, 30 ऑक्टोबर : कोरोना काळात प्रत्येक जण विशेष काळजी घेत आहे. मास्कशिवाय घराबाहेर पडण जोखीम होऊन बसलं आहे. अशावेळी अभिनेते-कलाकार देखील योग्य ती खबरदारी घेत आहेत. बॉलिवूड सेलेब्जनी काम जरी सुरू केलं असलं तरी त्यांना आधीपेक्षा जास्त काळजी घेऊन वावरावं लागत आहे. विशेष म्हणजे आता अनेकजण चाहत्यांच्या गर्दीत जाणं टाळत आहेत. अभिनेता विकी कौशलचा (Vicky Kaushal) देखील असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये विकी देखील काटेकोरपणे मास्क घालण्याचा नियम पाळताना दिसत आहे. पण त्याच्या एका चाहतीने अखेर त्याला मास्क अर्धा का होईना पण काढायला लावलाच. विकी कौशलने मास्क घातल्याने त्याच्या या चाहतीला हवा तसा फोटो काढता येत नव्हता. त्यामुळे तिने विनंती करून त्याला मास्क काढायला सांगितले. पण विकी तसं करत नाही.
  View this post on Instagram

  Well convinced and that cute selfie of #VickyKaushal 😜

  A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

  विकी या मुलीबरोबर सेल्फी काढायला तयार होतो, पण तो मास्क काढत नाही. शेवटी चाहतीच्या आग्रहाखातर तो अर्ध्यापर्यंत मास्क उतरवतो आणि स्वत: सेल्फी क्लिक करतो. Viral Bhayani ने हा व्हिडीओ त्याच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. (हे वाचा-अंकिता लोखंडेला जुन्या साड्या पाहून आली सुशांतबरोबर केलेल्या त्या मालिकेची आठवण) हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना Viral ने त्या चाहतीचं कौतुक केलं आहे. त्याने असं म्हटलं आहे की, 'Well convinced आणि विकी कौशलचा क्यूट सेल्फी'.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Vicky kaushal, मनोरंजन

  पुढील बातम्या