यानंतर कपिल गीता कपूरबरोबर फ्लर्टिंग करताना दिसतो. तो तिच्या सौंदर्याचे कौतुक करतो आणि त्या बदल्यात त्याची प्रशंसा करायला सांगतो. यावर गीता कपूर उत्तर देते, कपिल, तू माझ्या डोळ्यात बघ, तुला तू किती सुंदर कळेल'. शोमध्ये कृष्णा अभिषेक पुन्हा एकदा जॅकी श्रॉफ बनून आपले मनोरंजन करणार आहे. तसेच चंदन प्रभाकर, भारती सिंग आणि शुमोना चक्रवर्तीसुद्धा सगळ्यांना हसवताना दिसतील. गणेश आचार्यानी आजपर्यंत अनेक प्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्रींच्या गाण्याचं दिग्दर्शन केलं आहे. चिकनी चमेली, मस्ती की पाठशाला, 'मल्हारी'सारख्या प्रसिद्ध गाण्यांचं दिग्दर्शन गणेशने केलं आहे. तसेच 2013 मध्ये गणेश ABCD या सिनेमात स्वतः थिरकताना दिसला. गणेशला 2013 मधे 'भाग मिल्खा भाग' मधील 'हवन कुंड' या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sony tv, The kapil sharma show