मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /‘आशिकी गर्ल’चा No Makeup Look'; श्रद्धा कपूरचे सुंदर फोटो झाले VIRAL

‘आशिकी गर्ल’चा No Makeup Look'; श्रद्धा कपूरचे सुंदर फोटो झाले VIRAL

नुकताच श्रद्धा आपल्या घराच्या बाहेर अगदी सध्या नाईट ड्रेसमध्ये विदाऊट मेकअप आपल्या वडीलांसोबत दिसून आली आहे.

नुकताच श्रद्धा आपल्या घराच्या बाहेर अगदी सध्या नाईट ड्रेसमध्ये विदाऊट मेकअप आपल्या वडीलांसोबत दिसून आली आहे.

नुकताच श्रद्धा आपल्या घराच्या बाहेर अगदी सध्या नाईट ड्रेसमध्ये विदाऊट मेकअप आपल्या वडीलांसोबत दिसून आली आहे.

मुंबई, 10 जून-  बॉलिवूडची (Bollywood)  ‘आशिकी गर्ल’ श्रद्धा कपूर(Shraddha Kapoor) सरळसाध्या स्वभावासाठी ओळखली जाते. श्रद्धा जितकी सुंदर आहे, तितकाच सुंदर तिचा अभिनय आहे. श्रद्धाने फार कमी वेळेत बॉलिवूडमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. अभिनेता शक्ती कपूर यांची ही लेक त्यांच्या सारखीच उत्तम कलाकार म्हणून नावारूपास आली आहे. सध्या श्रद्धाचा नो मेकअप लुक (No Makeup Look) चांगलाच व्हायरल होतं आहे. नुकताच श्रद्धा आपल्या घराच्या बाहेर अगदी सध्या नाईट ड्रेसमध्ये विदाऊट मेकअप आपल्या वडीलांसोबत दिसून आली आहे.

मीडिया फोटोग्राफर मानव मंगलानी यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर नुकताच श्रद्धाचा एक फोटो शेयर केला आहे. त्यामध्ये श्रद्धा काळ्या टी शर्ट आणि मरून रंगाच्या नाईट पॅन्टमध्ये दिसून येत आहे. तसेच श्रद्धाने केसांची चापून एक वेणीसुद्धा घातली आहे. आणि डोळ्यावर चश्मा चढवला आहे. हातात मोबाईल धरून श्रद्धा काहीतरी टिपण्याचा प्रयत्न करत आहे. श्रद्धा यावेळी विदाऊट मेकअप आहे. तिचा हा साधा अंदाज चाहत्यांना खुपचं पसंत पडत आहे. ती मेकअपमुळे जितकी सुदंर दिसते. तितकीच विदाऊट मेकअपही ती सुंदर दिसते, अशा कमेंट्स चाहते करत आहेत. चाहत्यांनी या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. श्रद्धासोबत यावेळी तिचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेता शक्ती कपूरसुद्धा आहेत.

(हे वाचा: VIDEO: नवी वकील देविसिंगला फासावर लटकवणार? की फसणार डॉक्टरच्या जाळ्यात?  )

श्रद्धाने बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ‘आशिकी 2’ ती रातोरात स्टार झाली होती. त्यानंतर एक विलेन, बागी, रॉकस्टार, छिछोरे, एबीसीडी 2, ओके जानू, स्ट्रीट डान्सर यांसारख्या अनेक चित्रपटात तिने अभिनय केला आहे. सोशल मीडियावर सुद्धा श्रद्धाचे मोठे फॉलोअर्स आहेत.

(हे वाचा: VIDEO:'बडी मुश्कील बाबा बडी मुश्कील', नऊवारी साडीत किशोरी शहाणेंचा धम्माल डान्स)

श्रद्धा अभिनेत्रीसोबतचं एक उत्तम गायिका आणि डान्सरसुद्धा आहे. त्याचबरोबर श्रद्धाला प्राण्यांची खुपचं आवड आहे. ती सतत आपल्या पाळीव प्राण्यांसोबत वेळ घालवत असते. इतकचं नव्हे तर त्यांचे वाढदिवससुद्धा तितक्याच धुमधडाक्यात ती साजरे करत असते. या सर्व अंदाजामुळेच चाहते तिच्यावर फिदा आहेत.

First published:

Tags: Bollywood, Shraddha kapoor, Social media viral