• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • करीनाला नाही वाटत आपल्या मुलांनी व्हावं फिल्मस्टार; स्वतः केला खुलासा

करीनाला नाही वाटत आपल्या मुलांनी व्हावं फिल्मस्टार; स्वतः केला खुलासा

अभिनेत्री करीना कपूर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असते. ती बिनधास्तपणे आपलं मत मांडतानासुद्धा दिसून येते.

 • Share this:
  मुंबई, 15 ऑगस्ट- बॉलिवूड (Bollywood)  अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) आणि सैफ अली खान गेली अनेक दिवस मुलगा जेह(Jeh) उर्फ जहांगीरच्या नावावरून चर्चेत आहेत. नुकताच सर्वांना जेहची पाहिली झलक सर्वांसमोर आली आहे. जेह म्हणजेच जहांगीर आपल्या आईबाबासोबत अजोबा रणधीर कपूरच्या घरी आला होता. त्यावेळी तो मीडियाच्या कॅमेरात कैद झाला होता. दरम्यान करीनाने खुलासा करत म्हटलं आहे, की ‘तिला आपल्या मुलांना फिल्मस्टार बनवायचं नाहीय’. अभिनेत्री करीना कपूर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असते. ती बिनधास्तपणे आपलं मत मांडतानासुद्धा दिसून येते. नुकताच करीनाने एचटी ब्रांचला एक मुलाखत दिली होती. त्यामध्ये तिने अनेक गोष्टींवर मोकळेपणाने संवाद साधला आहे. तसेच आपल्या मुलांबद्दलही बिनधास्त गप्पा मारल्या आहेत. यावेळी बोलताना करीना म्हणाली, ‘माझा छोटा मुलगा जेह आत्ता 6 महिन्यांचा आहे. आणि तो सेम माझ्यासारखाचं दिसतो’. (हे वाचा:Shershaah: सिद्धार्थ कसा बनला कॅप्टन विक्रम बत्रा; जाणून घ्या संपूर्ण किस्सा  ) तसेच करीनाने पुढं म्हटलं आहे, ‘मला नाही वाटत की माझ्या मुलांनी अभिनेताचं व्हाव. मला आवडेल त्यांनी वेगळ्या क्षेत्रात आपलं नाव केलं तरी. मला आवडेल जेव्हा तैमुर माझ्या जवळ येऊन मला म्हणेल मी माउंट एव्हरेस्ट चढू इच्छितो किंवा अन्य काही करू इच्छितो. मी प्रत्येक गोष्टींमध्ये माझ्या मुलांना सहकार्य करेन’. (हे वाचा:मुलीसोबत लिसा हेडनने पहिल्यांदाच शेअर केले फोटो; पतीने सांगितलं लेकीचं नाव  ) करीना म्हणते,की ‘जेह आणि तैमुर दोघांमध्ये खूपच फरक आहे. तैमुरला जास्त चेहरे समोर असलेलं आवडत नव्हतं. तर जेहचं त्याच्या अगदी उलट आहे त्याला जास्त लोक समोर असलेलं आवडत. तसेच तैमुरला रंग, पेंटिंग, काहीतरी नवनवीन शोधण्यामध्ये रस आहे. तो अगदी सैफसारखा आहे. तर जेह मात्र अगदी शांत आहे’. करीनाने यावेळी आपल्या मातृत्वावर आणि आपल्या मुलांवर दिलखुलास गप्पा मारल्या आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published: