मामा-भाच्याच्या नात्यात दुरावा, गोविंदा का आहे कृष्णावर नाराज ?

मामा-भाच्याच्या नात्यात दुरावा, गोविंदा का आहे कृष्णावर नाराज ?

  • Share this:

23 जून : अभिनेता गोविंदा आणि त्याचा भाचा कृष्णा अभिषेक यांच्या नात्यातील दुरावा गेल्या २ वर्षांपासून वाढतच चालला आहे. याबद्दल कृष्णा आणि त्याची मामी सुनीता आहुजा यांच्या वक्तव्यांवरून स्पष्ट होते की त्यांचं नातं दिवसेंदिवस बिघडतच चाललं आहे.

'बॉम्बे टाइम्स'ला दिलेल्या मुलाखती दरम्यान बोलताना सुनीता म्हणाली की, मामा-भाच्याचं नातं सुधारण्याची काही चिन्हे दिसत नाहीयेत. सुनीताने मीडियावर राग व्यक्त करताना म्हटले की, कृष्णा ने नेहमी स्वतःला गोविंदाचा भाचा म्हणून फायदा घेतला आहे. आम्हीही त्याला नेहमी आपलं मानत आलो आहोत. मात्र तो आमच्या पाठीमागे आमची निंदा करत असतो.

माझ्या मुलांच्या वाढदिवसालाही गोविंदा आले नाहीत - कृष्णा

तर दुसरीकडे कृष्णाने सुनीताच्या या दाव्याचा साफ इन्कार केला आहे. तो म्हणाला की इंडस्ट्रीत त्याच नाव त्याच्या चांगल्या कामामुळे झालंय ना की गोविंदामुळे. गोविंदाने ना मला लाँच केलं ना त्याच्यामुळे मला कुठे काम मिळालं.  सुनिताच्या वक्तव्यावर बोलताना कृष्णा पुढे म्हणाला की, त्याच्या करिअर मधील यशाबद्दल गोविंदाचे आभार मानण्याचा प्रश्नच येत नाही. तो असंही म्हणाला की, व्यक्तिगत स्तरावर पाहायचं झाल्यास त्याचा 'चीची' मामा नेहमी त्याच्या पाठीशी उभा राहिला आहे.

पण कृष्णाने सुनीताचा हा दावा मान्य केला की, तो त्यांच्या घरी राहत असे. आणि ६ वर्षे तो त्यांच्या सोबत राहिला. नेहमी त्याने परस्परांना आदर आणि प्रेमही दिले.

कृष्णाच्या म्हणण्यानुसार,  गोविंदा आणि पत्नी सुनीता त्याच्या जुडवा मुलांच्या वाढदिवसाला अनुपस्थित राहिले. तर सुनीता म्हणते त्यांना पार्टीत बोलावलं गेलं नाही आणि वाढदिवसाच्यावेळी आम्ही लंडन दौऱ्यावर होतो. मात्र कृष्णाच्या म्हणण्यानुसार त्याने गोविंदा आणि सुनीताला पार्टीचं आमंत्रण दिलं होतं तरी त्यांनी जाणून-बुजून लंडन ट्रिप प्लॅन केली.

दोन्ही परिवार दुःखी आहेत, मात्र आता हे संबंध सुधारण्याची शक्यता कमीच आहे.

दोन वर्षांपूर्वी ज्या पद्धतीने संबंध बिघडले त्याबद्दल वाईट वाटतं. खरं तर त्यांना कृष्णाची पत्नी कश्मिराने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टचं जास्त वाईट वाटलं. काश्मिराने बर्थडे च्या घटनेनंतर लिहिलं होतं की, "लोक पैश्यासाठी नाचतात". सुनीता मानते की, ते एकत्र कृष्णाच्या एका शो मध्ये गेले होते  आणि कश्मिराची ही पोस्ट त्याच संदर्भात होती. मात्र यानंतर कृष्णा आणि कश्मिरने माफी मागितली आणि ही पोस्ट यांच्यासंदर्भात नव्हती असं स्पष्टही केलं.

First published: June 23, 2018, 9:08 PM IST

ताज्या बातम्या