नानांनी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मला जीवे मारण्याची धमकी दिली होती,तनुश्रीचा आरोप

नानांनी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मला जीवे मारण्याची धमकी दिली होती,तनुश्रीचा आरोप

2008 च्या घटनेनंतर आज आरोप का केले जात आहे ? बिग बाॅसच्या घरात तुला जायचंय का ? असा थेट सवाल आम्ही तनुश्रीला विचारला.

  • Share this:

 

शिखा धारीवाल, मुंबई, 26 सप्टेंबर : बाॅलिवूडचे अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर 'आशिक बनाया आपने' फेम अभिनेत्री तनुश्री दत्ताने 2008 साली विनयभंगाचे गंभीर आरोप केले होते. या प्रकरणानंतर तनुश्रीने न्यूज 18 सोबत खास बातचीत केली. यावेळी तिने आपल्यासोबत घडलेली हकीकत सांगितली.

2008 मध्ये 'हाॅर्न ओके प्लीज' या सिनेमाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी माझ्यासोबत गैरव्यवहार केला होता. मी त्यांना विरोध केला. पण त्यांनी याचा बदला घेण्यासाठी संपूर्ण चित्रपटात मला त्रास दिला. नानांनी माझ्या एका गाण्यामध्ये मला त्रास देणारे आक्षेपार्ह सीनही ठेवले होते.

नाना एवढ्यावर थांबले नाही. तर त्यांनी माझ्या कुटुंबालाही त्रास दिला. शुटिंगच्या नंतर मी घरी निघाले तेव्हा त्यांनी गाडीवर दगडफेक केली होती असा आरोपही तनुश्रीने केला. तसंच मनसेच्या कार्यकर्त्यांकडून त्यांनी मला आणि माझ्या परिवाराला जीवे मारण्याची धमकी दिली. त्या दिवशी सेटवर तणावपूर्ण वातावरण होते. एका कलाकाराने जर सेटवर मनसेचे कार्यकर्ते बोलावले तर काय वातावरण असेल असंही तुनश्रीने सांगितलं.

मी पोलिसांनी तक्रार दाखल करण्यासाठी गेली होती पण माझी तक्रार दाखल करून घेण्यात आली नाही. उलट माझ्याच विरोधात उलटी तक्रार दाखल करण्यात आली होती असंही तिने सांगितलं.

आज देशात मुलीसोबत गैरव्यवहार होणे ही फार मोठी गोष्ट राहिली नाही. कुठेही आणि कधीही अशा घटना घडत आहे. पण जर लोकं समोर आली तर अशा घटनांना आळा घालता येईल. मलाही इंडस्ट्रीमधून कुणीच मदत केली नाही. सर्वांनी असं दाखवलं की, जणू काही झालंच नाही.

नाना पाटेकर ज्या प्रकारे वागळे त्यामुळे मला खूप त्रास झाला. नानांनी माझी माफी मागावी अशी अपेक्षा होती पण त्यांनी राजकीय आणि कायदेशीरपणे खूप दिवस त्रास दिला असा आरोपही तनुश्रीने केला.

2008 च्या घटनेनंतर आज आरोप का केले जात आहे ? बिग बाॅसच्या घरात तुला जायचंय का ? असा थेट सवाल आम्ही तनुश्रीला विचारला. त्यावर तिने स्पष्ट केलं की, मला याची आवश्यक्ता नाही. माझा बिग बाॅसच्या घरात जाण्याचा कोणताही इरादा नाही. मी सध्या अमेरिकेत राहते. इथं फक्त सहा महिन्यांसाठी कुटुंबाकडे सुटटी घालवण्यासाठी आलीये.

========================================================================

VIDEO : भररस्त्यावर सपासप वार करून केला खून,पोलिसांची बघ्याची भूमिका

First published: September 26, 2018, 9:10 PM IST

ताज्या बातम्या