मुंबई, 30 जून- बालपण(Childhood) हे नेहमीचं सुंदर असतं. मग ते सर्वसामन्य लोक असो किंवा कलाकार सर्वांनाचं आपल्या बालपणाच्या आठवणीत रमायला आवडतं. म्हणूनचं कलाकार सतत आपल्या बालपणीचे गोंडस फोटो आपल्या सोशल मीडियावर(Social Media) शेयर करून आठवणींना उजाळा देत असतात. असाच एक सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. या फोटोतील ही गोंडस मुलगी कोण आहे असा सर्वांनाचं प्रश्न पडला आहे. चला तर मग जाणून घेऊया कोण आहे ही चिमुकली...
View this post on Instagram
नुकताच सोशल मीडियावर एका गोंडस मुलीचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोतील मुलगी दुसरी कोणी नसून लोकप्रिय गायिका ध्वनी भानुशाली आहे. ध्वनीने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या बालपणीचा फोटो शेयर केला आहे. हा फोटो पाहून चाहते मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत. ध्वनीचा हा फोटो चाहत्यांना खुपचं पसंत पडत आहे.
View this post on Instagram
ध्वनीचा जन्म मुंबईमध्येच झाला आहे. तिचे वडील विनोद भानुशाली हे आहेत. ते टी सिरीजच्या मार्केटिंग आणि पब्लिशिंग विभागाचे अध्यक्ष आहेत. ध्वनीला एक लहान बहीणसुद्धा आहे तिचं नाव दिया भानुशाली असं आहे.
(हे वाचा:मंदिरा-राजची जोडी होती खुपचं रोमँटिक; पाहा Unseen Photo )
आपल्या गोड आवाजने ध्वनी सध्या तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. ध्वनीचा आवाज जितका सुंदर आहे, तितकीच तीसुद्धा सुंदर आहे. बघता बघता ती अगदी कमी वेळेत देशाचा क्रश बनली आहे. तिच्या प्रत्येक गाण्याला चाहत्यांकडून सुपरहिटची पावती मिळत आहे. ध्वनीने अलीकडच्या अनेक चित्रपटांच्या गाण्यांना आपला आवाज दिला आहे. तसेच तिनं अनेक स्वतंत्र अल्बमसुद्धा केले आहेत.
(हे वाचा:मिलिंद इंगळेची नवी इनिंग; 'गवय्या ते खवय्या' मधून लवकरच येणार भेटीला )
2018 मध्ये ध्वनीने ‘वेलकम टू न्यूयॉर्क’ मधील ‘ईश्तेहार’ या गाण्याने पार्श्वगायिका म्हणून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं होतं. तसेच तसेच नेहा कक्करसोबत तिनं ‘दिलबर’ हे गाणंसुद्धा गायिलं आहे. ‘दिलबर’ बिलबोर्डच्या टॉप 10 मध्ये समाविष्ट होणारं पाहिलं हिंदी गाणं होतं. त्याचबरोबर ध्वनीने मिका सिंग, गुरु रंधावा, सचेत टंडन, जसबीर यांच्यासोबतही सुपरहिट गाणी दिली आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Playback singer