• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • कार्तिक आर्यन सांगणार 'सत्यनारायण की कथा'! मराठमोळा समीर विद्वांस करणार दिग्दर्शन

कार्तिक आर्यन सांगणार 'सत्यनारायण की कथा'! मराठमोळा समीर विद्वांस करणार दिग्दर्शन

सोनू के टिटू की स्वीटी, पती पत्नी और ओ, लव्ह आजकल 2 अशा अनेक चित्रपटांमधून चाहत्यांची मनं जिंकली आहेत. फारच कमी वेळेत कार्तिकने मोठी लोकप्रियता मिळवली आहे.

 • Share this:
  मुंबई, 23 जून- बॉलिवूडचा (Bollywood)  हँडसम हंक म्हणून अभिनेता कार्तिक आर्यनला(Kartik Aryan) ओळखलं जातं. कार्तिक आपल्या क्युट लुकमुळे तरुणींच्या गळयातील ताईत बनला आहे. त्यामुळे कार्तिकच्या चित्रपटांची चाहते उत्सुकतेने वाट पाहात असतात. नुकताच कार्तिक सर्व चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. कार्तिक लवकरच एका नव्या चित्रपटात झळकणार आहे. कार्तिकने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडीओ (Video)  शेयर करत ही माहिती दिली आहे. सोनू के टिटू की स्वीटी, पती पत्नी और ओ, लव्ह आजकल 2 अशा अनेक चित्रपटांमधून चाहत्यांची मनं जिंकली आहेत. फारच कमी वेळेत कार्तिकने मोठी लोकप्रियता मिळवली आहे. आणि अगदी कमी वयात बॉलिवूडमध्ये आपलं एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. कार्तिक तरुणाईमध्ये खुपचं लोकप्रिय आहे. त्याच्या क्युट लुकवर तर अनेक तरुणी फिदा आहेत. त्यामुळे कार्तिकच्या प्रत्येक गोष्टींवर हे चाहते लक्ष ठेवून असतात. मग त्याची पर्सनल लाईफ असो किंवा प्रोफेशनल चाहत्यांना प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता लागलेली असते. त्यामुळे आज आम्ही अशीच एक आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. (हे वाचा:'या' अभिनेत्री डब्बू रत्नानींच्या कॅलेंडरसाठी झाल्या होत्या 'टॉपलेस', पाहा PHOTO  ) नुकताच कार्तिक आर्यनने आपल्या इन्स्टाग्रामवर एक छोटासा टीझर शेयर करत आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. तसेच कार्तिकने कॅप्शन देत हा चित्रपट आपल्या मनाच्या खुपचं जवळ असल्याचं म्हटलं आहे. ‘सत्यनारायण की कथा’ असं या चित्रपटाचं नाव आहे. साजिद नाडियादवाला यांनी नमो पिक्चर्सच्या सोबतीने हा प्रोमो रिलीज केला आहे. साजिद नाडीयादवालाचं या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. कार्तिकच्या या घोषणेनंतर चाहत्यांना खुपचं आनंद झाला आहे. (हे वाचा:  शाहरुख खाननं का करत नाही अक्षय कुमारसोबत काम? कारण ऐकून तुमचंही डोकं चक्रावेल) राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी दिग्दर्शक करणार चित्रपटाचं दिग्दर्शन ‘सत्यनारायण की कथा’ हा अभिनेता कार्तिक आर्यन याची मुख्य भूमिका असलेला आणि साजिद नाडीयादवाला यांची निर्मिती असलेला चित्रपट आहे. मात्र खास बाब म्हणजे या चित्रपटाचं दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेता आपल्या सर्वांचा लाडका दिग्दर्शक समीर विध्वंस हा करणार आहे. त्यामुळे सर्वांनाचं आनंद झाला आहे. हा चित्रपट एका लव्हस्टोरीवर आधारित असणार आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: