Home /News /entertainment /

‘लगान’ ते मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटांसाठी शाहरुख होता पहिली पसंत

‘लगान’ ते मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटांसाठी शाहरुख होता पहिली पसंत

प्रत्येक कलाकार खूपच विचारपूर्वक भूमिकांची निवड करतात. मात्र अनेकवेळा त्यांच्याकडून अशा भूमिका निसटतात ज्या नंतर तुफान प्रसिद्ध होतात. असचं काहीसं झालं आहे, शाहरुख खानसोबत.

  मुंबई, 1 सप्टेंबर- बॉलिवूडचा(Bollywood) किंग म्हणून अभिनेता शाहरुख खानला(Shahrukh Khan) ओळखलं जातं. आपल्या खास शैलीनं शाहरुखनं आपलं एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. आजपर्यंत त्याने अनेक दमदार भूमिका साकारत आपल्या अभिनयाची जादू सर्वांनावर पसरवली आहे. मात्र अशा अनेक भूमिका आहेत ज्यासाठी मेकर्सची पहिली पसंती शाहरुख खान होता, मात्र त्याने नकार दिल्यानंतर त्या चित्रपटात दुसऱ्या अभिनेत्यांची वर्णी लागली आणि विशेष म्हणजे ते चित्रपट सुपरहिट सुद्धा ठरले. जाणून घेऊया त्या चित्रपटांनाबद्दल.
  View this post on Instagram

  A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

  प्रत्येक कलाकार खूपच विचारपूर्वक भूमिकांची निवड करतात. मात्र अनेकवेळा त्यांच्याकडून अशा भूमिका निसटतात ज्या नंतर तुफान प्रसिद्ध होतात. असचं काहीसं झालं आहे, शाहरुख खानसोबत. ज्या चित्रपटामुळे आमिर खानच्या अभिनयाची जगभर चर्चा झाली त्या चित्रपटासाठी प्रथम शाहरुख खानला विचारणा करण्यात आली होती. मात्र त्याने नकार दिल्या नंतर तो चित्रपट आमिरच्या हाती लागला. आपण बोलत आहोत ‘लगान’ चित्रपटाबद्दल. यासाठी शाहरुख खानने नकार दिला होता. (हे वाचा: "बेटा जग जिंकून घे" मुलाच्या 15व्या वाढदिवसानिमीत्त महेशबाबूची भावनिक पोस्ट) तसेच हसवून हसवून सर्वांना लोटपोट करणारा चित्रपट ‘मुन्नाभाई एमबीबीएस’साठी आधी शाहरुखला विचारणा झाली होती. जर शाहरुखने होकार दिला असता, तर सर्किटसोबत संजय दत्त नव्हे तर शाहरुख खान दिसला असता. फारच कमी लोकांना माहिती आहे, स्लमडॉग मिलेनीयरमध्ये अनिल कपूरच्या भुमिकेसाठी आधी शाहरुखला विचारण्यात आलं होतं. मात्र त्याने नकार दिल्यानानंतर अनिल कपूर यांची वर्णी लागली होती. हा चित्रपट फक्त हिट नाही ठरला तर त्याला ऑस्करसाठी नामांकन मिळालं होतं. (हे वाचा:मराठी कार्यक्रमात सहभागी होणार लेक म्हणून माधुरीची आई आनंदाने भारावली  ) तसेच 2008 मध्ये आलेला ऐतिहासिक चित्रपट ‘जोधा अकबर’साठी सुद्धा प्रथम शाहरुखला संधी मिळाली होती. मात्र त्याने नकार दिला आणि ऐश्वर्यासोबत अकबर म्हणून हृतिक रोशन झळकला. इतकचं नव्हे तर सुपरहिट ठरलेला ‘एक था टायगर’साठी आधी शाहरुख खान पहिली पसंत होता मात्र त्याच्या नकार नंतर ही भूमिका सलमानने साकारली.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bollywood, Shahrukh khan

  पुढील बातम्या