मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Bollywood Drug Case: मुच्छड पानवालाला चौकशीसाठी एनसीबीकडून समन्स

Bollywood Drug Case: मुच्छड पानवालाला चौकशीसाठी एनसीबीकडून समन्स

मुंबईतील सर्वात पॉश भागात, kems कॉर्नरवर मुच्छड पानवाल्याचं एक पानाचं दुकान आहे.

मुंबईतील सर्वात पॉश भागात, kems कॉर्नरवर मुच्छड पानवाल्याचं एक पानाचं दुकान आहे.

मुंबईतील सर्वात पॉश भागात, kems कॉर्नरवर मुच्छड पानवाल्याचं एक पानाचं दुकान आहे.

मुंबई, 11 जानेवारी : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने, बॉलिवूड ड्रग्स कनेक्शनप्रकरणी मुच्छड पानवालाला समन्स पाठवाला आहे. एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, मुच्छड पानवाला अटक करण्यात आलेल्या राहिला फर्निचरवाला हिच्या संपर्कात होता. पुढील तपासासाठी आता एनसीबीने मुच्छड पानवालाला समन्स पाठवला आहे.

मुंबईतील सर्वात पॉश भागात, kems कॉर्नरवर मुच्छड पानवाल्याचं एक पानाचं दुकान आहे. बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्जाची एक्स मॅनेजर राहिला फर्निचरवाला प्रकरणात चौकशीसाठी मुच्छड पानवालाला समन्स पाठवण्यात आला आहे.

एनसीबीने शनिवारी एका ब्रिटिश नागरिकासह तीन लोकांना अटक केली. या तिघांकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आलं आहे. या तिघांमध्ये ब्रिटिश नागरिक करण सजनानीसह दिया मिर्जाची एक्स मॅनेजर राहिला फर्निचरवाला आणि तिची बहिण शाईस्ता फर्निचरवाला यांचा समावेश आहे.

ब्रिटिश नागरिक करण सजनानीला एनसीबीने वांद्र्यातून ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडून अमेरिकेतून मागवण्यात आलेला, अतिशय महाग खास प्रकारचा गांजा जप्त करण्यात आला आहे.

(वाचा - Bollywood Drugs Case : दिया मिर्जाच्या एक्स मॅनेजरला NCB कडून अटक; 200 किलोग्रॅम गांजा जप्त)

दुसरीकडे, अभिनेता अर्जुन रामपालची बहीण कोमल रामपाललाही एनसीबीने पुन्हा एकदा समन्स पाठवून आज चौकशीसाठी बोलावलं आहे. बॉलिवूड ड्रग्स केसप्रकरणी चौकशीसाठी तिला बोलवण्यात आलं आहे. यापूर्वीही कोमलला समन्स पाठवण्यात आला होता, परंतु ती चौकशीसाठी हजर झाली नसल्याची माहिती आहे.

यापूर्वी अर्जुन रामपाललाही एनसीबीने दोन वेळा चौकशीसाठी बोलावलं होतं. त्याशिवाय अर्जुनची गर्लफ्रेंड ग्रॅब्रिएलालाही चौकशीसाठी हजर राहावं लागलं होतं. नोव्हेंबर महिन्यात अर्जुन रामपालच्या मुंबईतील घरी एनसीबीने छापेमारी केली होती. या छापेमारीमध्ये एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत प्रतिबंधित औषधं मिळाली होती. मात्र अर्जुनने ड्रग्स प्रकरणात कोणताही व्यवहार न केल्याचं सांगितलं होतं. घरात सापडलेली औषधं बहिणीसाठी आणल्याचं त्याने सांगितलं होतं. त्याचप्रकरणी आता अर्जुनची बहीण कोमलला चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Drugs