Home /News /entertainment /

आणखी 2 बॉलिवूड स्टार्स NCBच्या रडारवर; सुरज गोडांबेच्या डायरीमध्ये अनेक कलाकारांची नावं

आणखी 2 बॉलिवूड स्टार्स NCBच्या रडारवर; सुरज गोडांबेच्या डायरीमध्ये अनेक कलाकारांची नावं

Bollywood Drug Case: सुरज गोडांबेला अटक केल्यानंतर त्याच्या डायरीमधून अनेक बॉलिवूड स्टार्सची नावं समोर आली आहेत. त्यामुळे NCBच्या गळाला अनेक बडे मासे लागणार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

    मुंबई, 10 डिसेंबर: बॉलिवूडवरचं ड्रग प्रकरणाचं (Drug Case) सावट दूर होताना दिसत नाही आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये ड्रग प्रकरणात कारवाई सुरू आहे. प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट आणि मेकअप आर्टिस्ट सुरज गोडांबे (Suraj Godambe) याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) अटक केली आहे. एनसीबीने सुरजकडून काही प्रमाणात कोकेनही जप्त केलं आहे. तो एका प्रसिद्ध प्रोडक्शन हाऊसमध्ये मेकअप डिपार्टमेंटचा मुख्य आहे. एनसीबीकडून मोठ्या प्रमाणात ड्रग प्रकरणात छापेमारी करण्याचे सत्र गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. सुरज गोडांबेची डायरीदेखील अधिकाऱ्यांनी जप्त केली होती. सुरज गोडांबेच्या डायरीमध्ये उल्लेख असणारे 2 अभिनेते आता NCBच्या रडारवर आहेत. त्यांची नावं मात्र अद्याप समोर आलेली नाहीत. त्यांनादेखील लवकरच चौकशीसाठी बोलवलं जाणार आहे. या दोन कलाकारांसोबत आणखीही अनेक बॉलिवूड स्टार्सची नावं सुरजच्या डायरीमध्ये सापडली आहेत अशी माहिती एनसीबीच्या अधिकाराऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे एनसीबी पुन्हा एकदा अॅक्शन मोडवर येणार असंच सध्या दिसत आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput Death Case) मृत्यू प्रकरणात समोर आलेल्या ड्रग कनेक्शननंतर बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातील अनेकांना एनसीबीच्या चौकशीला सामोरं जावं लागलं आहे. अनेक बडे मासे देखील एनसीबीच्या गळाला लागले आहेत. सुरजने बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध कलाकारांबरोबर काम केलं आहे. त्यामुळे त्याच्याकडे मिळालेल्या कोकेनचा आणि त्याने ज्यांच्याबरोबर काम केलं आहे त्या बॉलिवूड कलाकारांचा काही संंबंध आहे का, याचा तपास NCB कडून केला जाईल. मंगळवारी देखील एनसीबीने ड्रग प्रकरणात एकाला अटक केली होती. रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंह राजपूतला ड्रग्ज पुरवणाऱ्या अनुज केशवानी (Anuj Keshwani) ड्रग्स सप्लाय करणाऱ्या एका पेडलरला अटक करण्यात आली होती. एनसीबीने ड्रग पेडरर रिगल महाकालाला (Rigel Mahakala) अटक केली होती. रिगलने दिलेल्या माहितीनुसार, सध्या अंधेरी पश्चिम भागात एनसीबीकडून छापेमारी केली जात आहे. उच्च प्रतीची मलाना क्रिम आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Bollywood, Drugs

    पुढील बातम्या