BREAKING: Drug Case मध्ये बॉलिवूडमधून आणखी एकाला अटक, NCB ने जप्त केलं कोकेन

BREAKING: Drug Case मध्ये बॉलिवूडमधून आणखी एकाला अटक, NCB ने जप्त केलं कोकेन

Bollywood Drug Case: . गुरुवारी या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे. प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट आणि मेकअप आर्टिस्ट सुरज गोडांबे (Suraj Godambe) याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) अटक केली आहे.

  • Share this:

मुंबई, 10 डिसेंबर: बॉलिवूडवरचं ड्रग प्रकरणाचं (Drug Case) सावट दूर होताना दिसत नाही आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये ड्रग प्रकरणात कारवाई सुरू आहे. गुरुवारी देखील या प्रकरणात एकाला अटक  करण्यात आली आहे. प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट आणि मेकअप आर्टिस्ट सुरज गोडांबे (Suraj Godambe) याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) अटक केली आहे. एनसीबीने सुरजकडून काही प्रमाणात कोकेनही जप्त केलं आहे. तो एका प्रसिद्ध प्रोडक्शन हाऊसमध्ये मेकअप डिपार्टमेंटचा मुख्य आहे. एनसीबीकडून मोठ्या प्रमाणात ड्रग प्रकरणात छापेमारी करण्याचे सत्र गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput Death Case) मृत्यू प्रकरणात समोर आलेल्या ड्रग कनेक्शननंतर बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातील अनेकांना एनसीबीच्या चौकशीला सामोरं जावं लागलं आहे. अनेक बडे मासे देखील एनसीबीच्या गळाला लागले आहेत.

(हे वाचा-अंकिता लोखंडेची सुशांतला अनोखी श्रद्धांजली,VIDEO पाहून चाहत्यांचेही डोळे पाणावले)

सुरजने बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध कलाकारांबरोबर काम केलं आहे. त्यामुळे त्याच्याकडे मिळालेल्या कोकेनचा आणि त्याने ज्यांच्याबरोबर काम केलं आहे त्या बॉलिवूड कलाकारांचा काही संंबंध आहे का, याचा तपास NCB कडून केला जाईल अशी शक्यता आहे. यामध्ये आता आणखी कोणती मोठी नावं पुढे येतील हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल.

(हे वाचा-लता मंगेशकर ऑफ राणाघाट: रानू मंडल सध्या काय करतेय? पाहा VIDEO)

मंगळवारी देखील एनसीबीने ड्रग प्रकरणात एकाला अटक केली होती. रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंह राजपूतला ड्रग्ज पुरवणाऱ्या अनुज केशवानी (Anuj Keshwani) ड्रग्स सप्लाय करणाऱ्या एका पेडलरला अटक करण्यात आली होती. एनसीबीने ड्रग पेडरर रिगल महाकालाला (Rigel Mahakala) अटक केली होती. रिगलने दिलेल्या माहितीनुसार, सध्या अंधेरी पश्चिम भागात एनसीबीकडून छापेमारी केली जात आहे. उच्च प्रतीची मलाना क्रिम आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: December 10, 2020, 12:04 PM IST

ताज्या बातम्या