मुंबई, 16 डिसेंबर: मुंबईच्या एनडीपीएस कोर्टाने (NPDS Court) मंगळवारी धर्मा प्रॉडक्शनचा माजी कार्यकारी निर्माता क्षितिज रवी प्रसादला ड्रग्जप्रकरणात जामीन मंजूर केला आहे. ड्रग प्रकरणात अटक होण्याची त्याची दुसरी वेळ आहे. सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूच्या प्रकरणात ड्रग अँगल समोर आल्यानंतर एनसीबीने (NCB) अनेक बड्या नावांची चौकशी केली. अहवालानुसार, क्षितीज प्रसादला 4 ग्रॅम कोकेन खरेदीच्या केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. दरम्यान क्षितिज प्रसादला जामीन दिल्यानंतर त्याच्या मित्रमंडळींनी जोरदार सेलिब्रेशनही केलं.
काही दिवसांपूर्वी क्षितीज प्रसादने एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी त्याला धमकावल्याचा आरोप केला होता. त्याने असा आरोप केला होता की, वानखेडे यांनी त्याला धमकावले की स्टेटमेंटवर स्वाक्षरी न केल्यास ना त्याला त्याच्या कुटुंबीयांशी बोलता येईल ना ही त्याच्या वकिलांशी. 50 तास त्याला टॉर्चर कऱण्यात आले असे देखील क्षितीजच्या वकिलांनी म्हटलं होतं. यानंतर जबरदस्तीने त्याची सही घेण्यात आली, असा आरोप मानेशिंदेंनी केला आहे. सतीश मानेशिंदे यांनी असे म्हटले आहे की, एनसीबीचे संपूर्ण अटकसत्र, बनावट तपासणी आणि नोंदवण्यात आलेले जबाब एकाच गोष्टीकडे इशारा करतात की एनसीबीला करण जोहर आणि धर्मा प्रोडक्शनला यामध्ये फसवायचे आहे. असाही आरोप करण्यात येत होता.
Mumbai: Dharma Productions former executive producer Kshitij Ravi Prasad granted bail by Special NDPS court today in connection with a drug case.