मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अरबाज खान प्रॉडक्शनमध्ये काम करणाऱ्या हेअर स्टायलिस्टला बेड्या; NCBच्या कारवाईत ड्रगही जप्त

अरबाज खान प्रॉडक्शनमध्ये काम करणाऱ्या हेअर स्टायलिस्टला बेड्या; NCBच्या कारवाईत ड्रगही जप्त

Bollywood Drug Case: अरबाज खान प्रॉडक्शमध्ये काम करणाऱ्या हेअर स्टायलिस्ट सूरज गोडांबेला NCB ने अटक केली आहे. त्याच्या डायरीमध्ये अनेक बड्या सेलिब्रिटींची नावं आहेत.

  • Published by:  Amruta Abhyankar

मुंबई, 10 डिसेंबर: सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर (Sushant Singh Rajput Death Case) बॉलिवूडचं नाव एका वेगळ्याच विषयासाठी चर्चेत येऊ लागलं आणि ते म्हणजे बॉलिवूडशी निगडीत लोकांचं ड्रग अॅडिक्शन (Drug Case). अरबाज खान प्रॉडक्शनमध्ये मेकअप डिपार्टमेंटचा हेड असणाऱ्या सुरज गोडांबेला (Suraj Godambe) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं अटक केली आहे. त्याच्याकडून 11 ग्रॅम कोकेनही जप्त करण्यात आलं आहे. अंधेरीच्या लोखंडवाला परिसरात NCB ने ही कारवाई केली आहे. NCB चौकशीमध्ये सुजरने आत्तापर्यंत अनेक मोठी नावंही घेतली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

सुरज गोडांबे हा इंडस्ट्रीमधील नावाजलेला हेअर स्टायलिस्ट आणि मेकअप आरटिस्ट आहे. सुरजने अरबाज खान प्रॉडक्शनच्या बॅनरखाली निर्मित झालेल्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. दबंग सिनेमामध्ये सुद्धा सुरजने काम केलं आहे. सूरजच्या अटकेनंतर NCBच्या हाती त्याची डायरी लागली आहे. या डायरीमध्ये अनेक बड्या बॉलिवूड कलाकारांची नावं असल्याची माहिती NCBच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे येत्या काळात NCBच्या मोहिमेला पुन्हा जोर येणार आणि अनेक बडे सेलिब्रिटी NCBच्या हातात सापडणार असं चित्र निर्माण झालं आहे.

आजम शेख हा सर्वात मोठा ड्रग्स सप्लायर असून शोविक चक्रवर्ती पर्यन्त जे ड्रग्स पोहचत होत ते आजम शेख कडून इतर ड्रग्स सप्लायरला पुरवल जात होतं. बॉलीवूडमध्ये ड्रग्सचं जाळं मोठ्या प्रमाणात पसरलं आहे. बॉलिवूडमधील सेलिब्रिटी आणि नामांकित लोक स्वतः ड्रग्स न मागवता आपल्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांकडून ड्रग्स मागवतात. त्यामुळे सुरजचा वापर ड्रग्स मागविण्यासाठी कोणी करत होत का हा एनसीबीच्या तपासाचा केंद्रबिंदू असणार आहे.

दरम्यान मंगळवारीदेखील एनसीबीने ड्रग प्रकरणात एकाला अटक केली होती. रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंह राजपूतला ड्रग्ज पुरवणाऱ्या अनुज केशवानी (Anuj Keshwani) ड्रग्स सप्लाय करणाऱ्या एका पेडलरला अटक करण्यात आली होती. एनसीबीने ड्रग पेडरर रिगल महाकालाला (Rigel Mahakala) अटक केली होती. रिगलने दिलेल्या माहितीनुसार, सध्या अंधेरी पश्चिम भागात एनसीबीकडून छापेमारी केली जात आहे. उच्च प्रतीची मलाना क्रिम आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

First published:

Tags: Bollywood, Drugs