मुंबई, 10 जून- बॉलिवूडची(Bollywood) 'ड्रामा क्विन' राखी सावंत (Rakhi Sawant) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी सोशल मीडियावर एखाद्या मुद्दयावर व्हिडिओ टाकून किंवा मग काँट्रोवर्शिअल बोलून ती सर्वांचं लक्ष वेधून घेते. राखी नुकतीच बिग बॉसच्या 14व्या सिझनमध्ये दिसली होती. या कार्यक्रमात 14 लाख रुपये घेऊन ती शो बाहेर पडली होती. नेहमीच चर्चेत राहणाऱ्या आयटम गर्ल राखी सावंतजवळ किती संपत्ती आहे तुम्हाला माहितीए का? तिच्या संपत्तीबद्दल टीव्ही 9 हिंदीने वृत्त दिलंय. चला तर जाणून घेऊया राखीजवळ किती आणि कोणती संपत्ती आहे ते.
View this post on Instagram
अभिनेत्री राखी सावंतने केवळ हिंदीच नव्हे तर अनेक तमिळ, तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलंय. याशिवाय तिने अनेक हिंदी मालिका आणि रियॅलिटी शोमध्ये भाग घेतलाय. तर तिच्या संपत्तीबद्दल बोलायचं झाल्यास राखी 37 कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. तिचे मुंबईत अनेक फ्लॅट्स आहेत, असं ती बऱ्याचदा मुलाखतीत सांगत असते आणि ते खरं आहे. तिचे अंधेरी आणि जुहूमध्ये 2 फ्लॅट्स आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राखी स्टेज शो करून पैसे कमवते. राखीने आतापर्यंत जगभरात स्टेज शो केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राखीजवळ एक 11 कोटी रुपयांचा बंगला आहे. तसेच नुकतीच तिने नवीन पोलो कार देखील विकत घेतलीए. याशिवाय तिच्याजवळ फोर्ड एंडेव्हर कारही आहे. या कारची किंमत जवळपास 21 लाख रुपये आहे.
(हे वाचा: 'सूर्यवंशम' मधील तो छोटा मुलगा होता तरी कोण? वाचा तो सध्या काय करतो )
राखीने अग्निचक्र चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने अनेक चित्रपटात आयटम साँग्स केले. 2009 मध्ये तिने एका शोसाठी स्वतःचा स्वयंवर रचला होता. या शोचं नाव होतं राखी का स्वयंवर. या शोमध्ये तिने टोरंटोहून आलेल्या एका तरुणाशी लग्न देखील केलं होतं. मात्र, लग्नानंतर काही दिवसांनीच ती त्याच्यापासून वेगळी झाली. नंतर तिने रितेश नावाच्या एका एनआरआयसोबत लग्न केलंय. पण, हे लग्न जबरदस्ती लावलं गेलं असं तिने बिग बॉसमध्ये सांगितलं. लग्नानंतर तिचा पति तिला सोडून निघून गेला असंही तिने म्हटलं होतं. मात्र, यात कितपत सत्य आहे, याबद्दल राखीलाच माहिती.
(हे वाचा: बॉस लेडीच्या LOOK ची होतेय चर्चा; पाहा रुबिना दिलैकचा नवा PHOTOSHOOT )
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राखी सावंत आणि मीका सिंह यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. ज्यामध्ये हे दोघेही तब्बल 15 वर्षानंतर मुंबईतील कॉफी शॉपच्या बाहेर भेटताना दिसले. इतक्या वर्षांच्या वादानंतर जेव्हा दोघांची भेट झाली, त्यावेळी दोघेही एकमेकांचे कौतुक करताना दिसले. बिग बॉसमध्ये सामील झाल्याबद्दल मीका सिंगने राखी सावंतचे कौतुक केले तर राखी सावंतही मीका सिंगच्या सामाजिक कार्याचे कौतुक करताना दिसली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rakhi sawant