खऱ्या 'डॅडी'ला 'डॅडी' पहायला मिळणार नाही, कारण...

bollywood-don-arun-gawali-wanted-to-attend-the-premiere-of-the-film-

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 2, 2017 07:38 PM IST

खऱ्या 'डॅडी'ला 'डॅडी' पहायला मिळणार नाही, कारण...

02 सप्टेंबर : अर्जुन रामपालचा सिनेमा 'डॅडी' हा अरुण गवळींच्या आयुष्यावर आधारीत आहे. या सिनेमाच्या प्रीमिअरला उपस्थित राहण्याची 'डॅडी'ची खूप इच्छा होती. त्यानुसार सिनेमा बनवणाऱ्यांचं प्लॅनिंगही झालं होतं. हा सिनेमा 21 जुलैला रिलीज होणार होता पण तो आता 8 डिसेंबरला रिलीज होणार आहे.

पण हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. कारण जेल प्रशासनाने अरुण गवळीने पॅरोल देण्यास मंजुरी दिली नाही. एका वेबसाईटवरच्या बातमीनुसार गवळी यानी गणेशोत्सावासाठी पॅरोल मागितली होती. आणि याच दरम्यान ते चित्रपटही पाहणार असं त्यांचं प्लॅनिंग होतं, परंतू अधिकाऱ्यांनी त्यांना पॅरोल दिलाचं नाही.

त्यांच्या म्हणण्यानुसार सिनेमाच्या प्रीमिअरला गवळीची उपस्थिती म्हणजे न्याय व्यवस्थेला डाग लावण्यासारखं आहे. जर ते या सिनेमाच्या प्रमोशनसाठी जातात तर त्याचा जनतेला एक चुकीचा संदेश जातो.

डॅडी या सिनेमाची संपूर्ण कहाणी ही अरुण गवळींच्या जीवनावर आहे. सिनेमात अर्जुन रामपाल हा गवळींची भुमिका साकारत आहे. अर्जुनने गवळींसारखं दिसण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. गवळींसारखे आपलं नाक मोठं दिसावं यासाठी त्याने नकली नाक ही लावलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 2, 2017 07:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...