मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

भन्साळीच्या 'बैजू बावरा' मध्ये कार्तिक-रणबीर नव्हे तर 'या' अभिनेत्याची वर्णी

भन्साळीच्या 'बैजू बावरा' मध्ये कार्तिक-रणबीर नव्हे तर 'या' अभिनेत्याची वर्णी

संजय लीला भन्साळीच्या ‘बैजू बावरा’ या चित्रपटासाठी दिग्दर्शकाची पहिली पसंत अभिनेता रणबीर कपूर हा होता.

संजय लीला भन्साळीच्या ‘बैजू बावरा’ या चित्रपटासाठी दिग्दर्शकाची पहिली पसंत अभिनेता रणबीर कपूर हा होता.

संजय लीला भन्साळीच्या ‘बैजू बावरा’ या चित्रपटासाठी दिग्दर्शकाची पहिली पसंत अभिनेता रणबीर कपूर हा होता.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 4 ऑगस्ट- बॉलिवूड दिग्दर्शक (Bollywood Directore) संजय लीला भन्साळी(Sanjay Leela Bhansali) नेहमीचं आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत असतात. गेल्या अनेक दिवसांपासून ते आपल्या ‘गंगुबाई काठियावाडी’मुळे चर्चेत होते. त्यानंतर आत्ता ते आपल्या ‘बैजू बावरा’ (Baiju Bawara) या चित्रपटामुळे चर्चेत आले आहेत. या चित्रपटाच्या लीड रोलसाठी अभिनेता कार्तिक आर्यन आणि रणबीर कपूरच्या नावाची चर्चा सुरु होती. मात्र या दोघांनाही डच्चू देत या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंगची(Ranveer Singh) वर्णी लागली आहे. हा चित्रपट ‘म्युझिकल लव्हस्टोरी’ असणार आहे.

संजय लीला भन्साळीच्या ‘बैजू बावरा’ या चित्रपटासाठी दिग्दर्शकाची पहिली पसंत अभिनेता रणबीर कपूर हा होता. मात्र त्याने या चित्रपटाला नकार दिल्याचं म्हटलं जातं आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, रणबीर कपूरने या चित्रपटाला नकार दिल्यानंतर अभिनेता रणवीर सिंगची चित्रपटात एन्ट्री झाली आहे.

(हे वाचा: 'हनिमूनवर त्याने मला...'; पत्नीने हनी सिंगवर केला धक्कादायक आरोप)

भन्साळी प्रोडक्शनच्या खास सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटासाठी रणवीर सिंगच्या नावाची गांभीर्याने चर्चा सुरु आहे. मात्र अजून कोणताही ठाम निर्णय झालेला नाहीय. 2021 मध्येचं ‘बैजू बावरा’ चित्रपटाबद्दल माहिती समोर आली होती. यामध्ये सांगण्यात आलं होतं की, या चित्रपटा अजय देवगन, दीपिका पादुकोण आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असणार आहे.

सध्या अशी चर्चा आहे, की रणबीर ‘बैजू बावरा’ या चित्रपटासाठी खुपचं कन्फ्यूज आहे. त्याचा ठाम निर्णय होतं नाहीय. त्याने आपली ही द्विधा अवस्था भन्साळी आणि टीमशीसुद्धा शेयर केल्याचं म्हटलं जातं आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार रणबीर धर्मा प्रोडक्शनच्या काही प्रोजेक्ट्सबद्दलही कन्फ्युज आहे.

(हे वाचा:निक घरी येताच प्रियांका चोप्रा झाली भावुक; शेयर केला रोमँटिक PHOTO  )

सध्या दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आपल्या पहिल्या वेबसिरीजमध्ये व्यग्र आहे. ते आपली पहिली वेबसिरीज ‘हिरा मंडी’ ची निर्मिती करत आहेत. यासाठी त्यांनी आधीच अभिनेत्री हुमा कुरैशी आणि सोनाक्षी सिन्हाला फायनल केल आहे.

First published:

Tags: Kartik aryan, Ranbir kapoor, Ranveer sigh