Home /News /entertainment /

Bigg Boss OTT: करीना आणि मलायकासोबत बिग बॉसच्या घरात राहायचंय: करण जोहर

Bigg Boss OTT: करीना आणि मलायकासोबत बिग बॉसच्या घरात राहायचंय: करण जोहर

8 ऑगस्टपासून बिग बॉसला सुरवात होणार आहे. म्हणजेच 8 ऑगस्टपासून सर्व स्पर्धक बिग बॉसच्या घरात बंद होणार आहेत.

मुंबई, 3 ऑगस्ट-  छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोंपैकी (Reality Show) एक असणारा बिग बॉस (Bigg Boss) लवकरच आपल्या नव्या सिझनसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा शो लोकप्रिय आहे तसाच दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणांनी वादग्रस्त सुद्धा ठरत असतो. या रिअ‍ॅलिटी शोचा मोठा चाहता वर्ग आहे. सर्वजण बिग बॉसची आतुरतेने वाट पाहत असतात. दरवर्षी बिग बॉसच्या घरात नवीन काहीतरी प्रयोग होईल किंवा काहीतरी खास पाहायला मिळेल, याची सर्वांनाच उत्सुकता असते. या वर्षीचा बिग बॉस नवीन पद्धतीने सादर केला जाणार आहे. तो Voot या ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर 8 ऑगस्ट 2021 ला प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे OTT शोचे होस्टिंग (Hosting) निर्माता करण जोहर करणार आहे. टीव्हीवर (TV) प्रदर्शित होण्याअगोदर बिग बॉचे एपिसोड सहा आठवड्यांसाठी OTT वर दाखवले जातील. 8 ऑगस्टपासून बिग बॉसला सुरवात होणार आहे. म्हणजेच 8 ऑगस्टपासून सर्व स्पर्धक बिग बॉसच्या घरात बंद होणार आहेत. 2 ऑगस्टपासून सर्व स्पर्धकांना विलगीकरणात (Quarantine) ठेवण्यात आलं आहे. नेहमीप्रमाणे यावेळी बिगबॉसच्या घरात कोण असणार. मोठी हस्ती कोण असणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. त्यात यावेळी नव्या पद्धतीने सादर होणाऱ्या शोबद्दल प्रेक्षक अजूनच उत्सुक आहेत. सध्या सोशल मीडियावर बिग बॉस ओटीटीचे (Bigg Boss OTT) फोटो व्हायरल होत आहेत. यामध्ये बिग बॉसचे घर एकदम आकर्षक दिसून येत आहे. (हे वाचा: 'प्रतीक्षा नाही होतं'; म्हणत अर्जुन कपूरने शेयर केला मलायकाचा फोटो) करण जोहर बिग बॉस OTT होस्ट करण्यासाठी उत्सुक आहे. करण जोहरने म्हटलंय की, बिग बॉसच्या घरात सहा आठवडे राहणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. फोनशिवाय एक तासही मी राहू शकत नाही. कारण फोनशिवाय मी जगूच शकत नाहीत. जेव्हा करण जोहरला विचारण्यात आलं तुझ्या की, तुला आवडीच्या दोन सेलिब्रिटींसोबत बिग बॉसच्या घरात जाण्याची परवानगी मिळाली तर तू कोणाला निवडशील? यावर करण जोहरने फार मजेशीर उत्तर म्हटलं की, बेबो म्हणजेच करीना कपूर आणि मल्ला म्हणजे मलायका अरोरा सोबत असल्यास मला काहीच हरकत नसेल. या दोघींसोबत फोनशिवाय एका घरात बंद होणं किती मजेशीर असेल. (हे वाचा: Shocking! इन्स्टाग्रामवर गहना वशिष्ठचं न्यूड लाईव्ह सेशन; VIDEO पाहून बसेल धक्का) त्याच्या या उत्तराने सर्वजण आश्चर्यचकित झाले मात्र या दोन्ही सुंदर अभिनेत्रींसोबत करण जोहरचे खूप चांगले संबंध आहेत. करीना कपूर त्याला आपला भाऊ मानते. तर मलायका त्याला सर्वात चांगला मित्र समजते. तसंच करीना आणि मलायका या दोघी सुद्धा खूप जवळच्या मैत्रिणी आहेत. या दोघी एकत्र पार्टी करतात. स्पेशल दिवस (Special Days) एकत्र साजरे करतात. त्यामुळे या तिघांचं नात आणि घट्ट मैत्री पाहता करणला असं वाटतं की बिग बॉस ओटीटीच्या घरामध्ये बेबो आणि माला यांच्यासोबत बंद असणं आणि कुणाकडेच मोबाईल नसणं हा खरोखरच रोमांचकारी अनुभव असेल. करण जोहरच्या या प्रतिक्रियेनंतर बिग बॉसच्या घरात नक्की कोण असणार. खरंच करण जोहरची इच्छा पूर्ण होणार का? हे लवकरच आपल्याला समजेल.
First published:

Tags: Karan Johar, Kareena Kapoor, Malaika arora

पुढील बातम्या