मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाला अटक, कोर्टाने जामिनाचा अर्जही फेटाळला

बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाला अटक, कोर्टाने जामिनाचा अर्जही फेटाळला

 प्रसिद्ध दिग्दर्शक(Director) व्हीए श्रीकुमार मेनन(VA Shrikumar Menon) यांना पोलिसांनी फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 7 मे : प्रसिद्ध दिग्दर्शक (Director) व्हीए श्रीकुमार मेनन (VA Shrikumar Menon) यांना पोलिसांनी फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली आहे. श्रीवल्सम ग्रुपशी संबंधित असणारे राजेन्द्रन पिल्लई (Rajendran Pillai) यांनी त्यांचावर आर्थिक बाबतीत फसवणूक केल्याचा आरोप लावला आहे. आरोप करत त्यांनी म्हटलं आहे, की श्रीकुमार यांनी त्यांच्याकडून एका चित्रपटासाठी 7 कोटी रुपये घेतले होते. मात्र त्यांनी ते पैसे कधी परतच केले नाहीत.

पिल्लई यांनी श्रीकुमार यांच्यावर सन 2006 पासूनच्या पैशांच्या व्यवहाराबाबत तक्रार दाखल केली आहे. श्रीकुमार यांना 6 मे रोजी अटक करण्यात आली आहे. आणि आज त्यांना कोर्टात हजरदेखील करण्यात आलं होतं. तसेच पोलिसांकडून त्यांची चौकशी देखील करण्यात आली आहे. श्रीकुमार यांच्यावर आयपीसीच्या कलम 406 आणि कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकुमार यांनी जमिनीसाठी अर्ज केला होता. मात्र कोर्टाने तो फेटाळून लावला आहे.

(हे वाचा:‘देशात हे काय चाललंय?’; ऑक्सिजनच्या तुडवड्यावरुन सुनील शेट्टी संतापला  )

श्रीकुमार यांनी मोहनलाल यांचा अभिनय असणारा ‘ओडीयान’ या चित्रपटातून मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला आहे. हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यांनतर 2019 मध्ये अभिनेत्री मंजू वॉरियरने मीडिया कॅम्पेन सुरु असताना तिला बदनाम करण्याच्या प्रयत्न केल्याचा आरोप श्रीकुमार यांच्यावर लावला होता. या अभिनेत्रीच्या तक्रारीवरून श्रीकुमार यांना अटकसुद्धा करण्यात आली होती. मात्र नंतर जामिनीवर त्यांची सुटकासुद्धा करण्यात आली होती. मंजूने श्रीकुमार यांच्या ‘ओडीयान’ चित्रपटात काम देखील केलं आहे.

First published:

Tags: Bollywood News, Marathi entertainment