दिग्दर्शक मणिरत्नम यांची तब्येत बिघडली, तातडीने केले रुग्णालयात दाखल

दिग्दर्शक मणिरत्नम यांची तब्येत बिघडली, तातडीने केले रुग्णालयात दाखल

याआधी २००४ मध्ये युवा सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.

  • Share this:

चेन्नई, 17 जून- प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांना चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मणिरत्नम यांच्या हृदयात दुखू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. याआधी २००४ मध्ये युवा सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. मणिरत्नम यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं ट्विटरवरून समजलं. लोकेश नावाच्या युझरने ट्वीटमध्ये लिहिले की, ‘दिग्दर्शक मणिरत्नम यांना ग्रीम्स रोड अपोलो रुग्णालयात हृदयविकाराच्या आजारामुळे भरती करण्यात आले आहे.’ सध्या त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असल्याचं म्हटलं जात होतं. मणिरत्नम हे तमिळ दिग्दर्शक असून त्यांनी अनेक नावाजलेले हिंदी सिनेमेही दिग्दर्शित केले आहेत. यात बॉम्बे, दिल से, रावण, रोजा, युवा, गुरू या सिनेमांचा समावेश आहे.

हेही वाचा- Bigg Boss Marathi 2- घरातून दिगंबर नाईकची एग्झिट तर वीणा अभिजीत पुन्हा भिडले


Loading...


हेही वाचा- अरे देवा! फेसबुकवर बिकीनी फोटो टाकले म्हणून या डॉक्टरचं लायसन्स झालं रद्द

दरम्यान, निखील नावाच्या एका ट्विटर युझरने मणिरत्नम यांना घरी सोडण्यात आले असून, त्यांनी कामालाही सुरुवात केल्याचं म्हटलं आहे. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना घरी जाण्यास परवानगी दिली.काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या राय- बच्चन आणि मणिरत्नम ही हिट जोडी पुन्हा एकदा Ponniyin Selvan या सिनेमातून एकत्र येणार असं म्हटलं जात होतं. स्वतः ऐश्वर्याने या सिनेमात काम करण्याची मंजूरी दिल्याचं समजतं. सुरुवातीला या सिनेमात काम करण्यासाठी तेलगू- तमिळ सुपरस्टार अभिनेत्री अनुष्का शेट्टीलाही विचारण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. ऐश्वर्या आणि अनुष्काशिवाय चियान विक्रम, अमिताभ बच्चन, अमाल पॉल, कार्ती, जयाराम रवी यांचाही या सिनेमासाठी विचार केला जात आहे.

रोहित शर्मा ठरला भारताच्या विजयाचा शिल्पकार, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 17, 2019 12:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...