लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या अभिनेत्रीने मागितली PM मोदींची मदत, अनुराग कश्यप म्हणाला...

लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या अभिनेत्रीने मागितली PM मोदींची मदत, अनुराग कश्यप म्हणाला...

'माझ्या जीवाला धोका असून मदत करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे अभिनेत्रीनं केली आहे. '

  • Share this:

मुंबई, 20 सप्टेंबर: बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शन अनुराग कश्यपवर अभिनेत्रीनं लैंगिक छळाचा आरोप केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी माझ्या जीवाला धोका असून मदत करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे अभिनेत्रीनं केली आहे. या अभिनेत्रीनं ट्वीट करून दिग्दर्शन अनुराग कश्यप यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. त्यानंतर बॉलिवूडमध्ये खऴबळ उडाली. दरम्यान अभिनेत्री कंगना रणौत हिच्यासह अनेकांनी बॉलिवूडमधील दिग्गजांना टार्गेट केलं. या सगळ्या वादाची चर्चा सुरू असतानाच अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर गंभीर आरोप केले आहेत.

अभिनेत्री पायल घोषनं आपल्या हे आरोप केल्यानंतर आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगितल असून पंतप्रधान मोदींकडे मदत मागितली आहे. दरम्यान यावर दिग्दर्शन अनुराग कश्यपनेही ट्वीट करून आरोप फेटाळून लावल्याची माहिती मिळाली आहे. अभिनेत्रीचे आरोप बिनबुडाचे असून थोडी तरी मर्यादा बाळगा असं अनुराग कश्यपने अभिनेत्रीला सुनावलं आहे.

अजून बऱ्याच टीका बाकी आहेत. ही फक्त सुरुवात आहे. अनेक जण मला शांत राहण्याचा सल्ला देत आहेत. माहीत नाही कधी कोण कुठे कशापद्धतीनं टीका आणि आरोप करेल. अभिनेत्रीनं केलेले आरोप बिनबुडाचे असून थोडी तरी मर्यादा बाळगायला हवी असंही अनुरागनं ट्वीटमध्ये म्हटलं आहे. अभिनेत्री पायल घोषनं केलेल्या लैंगिक छळाचा आरोपाचं दिग्दर्शन अनुराग कश्यपनं ट्वीट करून खंडन केलं

अभिनेत्री पायल घोषनं काय केलं होतं ट्वीट?

'अनुराग कश्यप याने माझ्यावर जबरदस्ती केली आहे,' असा खळबळजनक आरोप पायल घोष हिने केला आहे. अभिनेत्रीने अनुराग कश्यप याच्यावर आरोप करताना आपल्या ट्वीटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टॅग केलं आहे.

'नरेंद्र मोदीजी आपण याप्रकरणी कारवाई करावी आणि या क्रिएटिव्ह माणसाआडचा राक्षस देशाला पाहू द्या,' अशी विनंतीही पायलने केली आहे. 'मला माहीत आहे की यामुळे माझे नुकसान होऊ शकते आणि माझी सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. कृपया मदत करा,' असंही तिने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 20, 2020, 8:20 AM IST
Tags:

ताज्या बातम्या