मुंबई, 20 जून : लोकप्रिय सैराट सिनेमाचा रिमेक असलेल्या धडक सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज झालंय. जान्हवी आणि ईशानवर चित्रित झालेलं हे गाणं गायलंय श्रेया घोषाल आणि अजय गोगावले यांनी. धडक है ना...हे टायटल साँग हळुवार आहे.
सैराटच्या गाण्यांनी सगळ्यांनाच याड लावलं. तेच झिंगाट हिंदीमध्येही यावं म्हणून निर्माता करण जोहरनं सिनेमाचं संगीत अजय-अतुलकडेच सोपवलं. आणि आज हे रोमँटिक गाणं रिलीज झालं.
काही दिवसांपूर्वीचं ‘धडक’चा ट्रेलर रिलीज झाला होता. १० जूनला रिलीज झालेला हा ट्रेलर आत्तापर्यंत ५० लाखांवर लोकांनी पाहिला आहे. ‘धडक’ हा ‘सैराट’ या ब्लॉकबस्टर मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे, पण निश्चितपणे ‘सैराट’पेक्षा ‘धडक’चा बाज वेगळा आहे, हे ट्रेलर पाहून जाणवते. सिनेमाची पार्श्वभूमी राजस्थानची आहे.
हेही वाचा
धडक 20 जुलैला रिलीज होणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा