मुंबई, 4 ऑगस्ट- बॉलिवूडची(Bollywood) ‘देसी गर्ल’ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या अभिनयाचा झेंडा फडकवणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा(Priyanka Chopra) होय. प्रियांका आपल्या चित्रपटांसोबतचं आपल्या पर्सनल लाईफमुळेसुद्धा चर्चेत असते. प्रियांकाने हॉलिवूड अभिनेता निक (Nick Jonas) जोनससोबत लग्न केलं आहे. ती सतत आपल्या पतीसोबत सुंदर फोटो शेयर (Share Photo) करत असते. या दोघांची जोडी सोशल मीडियावर खुपचं चर्चेत असते. या दोघांच्या रोमँटिक अंदाजावर चाहते नेहमीचं फिदा असतात.
View this post on Instagram
नुकताच प्रियांकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर निक जोनससोबत एक रोमँटिक फोटो शेयर केला आहे. यामध्ये ती निकला आलिंगन करताना दिसत आहे. सोबतचं तिने फोटोला कॅप्शन देत ‘He’s Home’ असं म्हटलं आहे. निक घरी आल्याच्या आनंदात हा फोटो प्रियांकाने शेयर केला आहे. प्रियांकाच्या चेहऱ्यावर अतिशय शांत भाव दिसत आहेत. ती या क्षणाचा अगदी शांत मनाने आनंद घेत असल्याचं दिसून येत आहे.
(हे वाचा: Raj Kundra Case: आर. माधवनचा शिल्पा शेट्टीला पाठींबा; कमेंट करत म्हटलं...)
अभिनेत्री प्रियांका आणि पती निक जोनसमध्ये वयाचं मोठं अंतर आहे. त्यांच्या लग्नानंतर अनेक दिवस हे दोघे सोशल मीडियावर ट्रोलसुद्धा होताना दिसले होते. मात्र या सर्व गोष्टींचा यांच्या नात्यावर अजिबात फरक पडत नाही. उलट दिवसेंदिवस हे दोघे अधिकचं रोमँटिक होतं आहेत. यातून त्यांच्यातील प्रेम दिसून येतं. चाहते मात्र या दोघांच्या जोडीला नेहमीचं पसंत करतात. त्यांच्या प्रत्येक कमेंटला भरभरून दाद देत असतात.
(हे वाचा: 'गोड आणि तिखट सर्वकाही...'; अनन्या पांडेने दाखवला आपला सुपरहॉट अवतार )
तसेच निक प्रियांकासोबत प्रत्येक भारतीय सण साजरे करताना दिसतो. या दोघांचे रंगपंचमीचे फोटोसुद्धा मोठ्या प्रमाणात पसंत करण्यात आले होते. तसेच प्रियांका सतत विचित्र ड्रेस परिधान केल्याने ट्रोलसुद्धा होते. मात्र प्रत्येकवेळी निक तिला पाठींबा देतो. आणि त्याच्या या अतरंगी स्टाईलचा आनंद घेतो. प्रियांका आणि निकला बॉलिवूडच्या अतिशय रोमँटिक कपलमधील एक समजलं जातं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nick jonas, Priyanka chopra