दीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत

दीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत

लग्न झाल्यावर त्यांचं एकमेकांशी किती जमेल, त्यांचे ग्रह कसे आहेत याबद्दल ज्योतिषांनी सांगितलंय.

  • Share this:

मुंबई, 14 नोव्हेंबर : आज सगळीकडे चर्चा आहे ती रणवीर सिंग आणि दीपिकाच्या लग्नाची. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे.  लग्न झाल्यावर त्यांचं एकमेकांशी किती जमेल, त्यांचे ग्रह कसे आहेत याबद्दल ज्योतिषांनी सांगितलंय. त्यांची केमिस्ट्री चांगलीच जुळते, यामागचं काय आहे कारण?


ज्योतिषांनी सांगितल्याप्रमाणे रणवीरची सनसाईन कर्क आहे, तर दीपिकाची मकर. त्यामुळे दीपिका नेहमीच कामाला वाहून घेणारी आहे. शिस्तप्रिय आहे. रणवीरची रास कर्क असल्यानं तो एकदम जिंदादिल, दिलखुलास आहे. नेहमीच मजामस्ती करणारा आहे. तो मनस्वी, मनमौजी आहे.


दीपिकाची मूनसाईन कर्क आहे. त्यामुळे ती खूप हळवी आहे. मध्यंतरी रणबीर कपूरशी ब्रेकअप झाल्यावर ती डिप्रेशनमध्ये गेली होती, ती याच हळवेपणामुळे. रणवीरची मूनसाईन मीन आहे. त्यामुळे तोही संवेदनशील आहे. या दोन राशींचं एकमेकांशी चांगलं जमतं. त्यामुळे दीपिका-रणवीर एकमेकांच्या सहवासात आनंदी असतात.


दीपिकाचा जन्म स्वाती नक्षत्रावर झालाय. तिचा राशीस्वामी राहू आहे. रणवीरचं नक्षत्र आहे शतभिषा. त्याचा राशीस्वामीही राहू आहे. त्यामुळे दोघांचं एकमेकांशी चांगलं जमतं. ते एकमेकांशी समजूतदारपणे वागतात.


काल ( 13 नोव्हेंबर ) रात्री संगीत सोहळा पार पडला. त्यावेळी रणवीर आणि दीपिकानं जोरदार डान्स केलाय. आता सगळे वाट पाहतायत ते  या डान्स व्हिडिओची. तो अजून बाहेर आलेला नाही. यावेळी कुटुंबातले लोक, मित्रमंडळी यांनी अक्षरश: जल्लोष केल्याची माहितीही समोर आलीय.


लग्नाच्या वेळी बाॅलिवूडचं कुणी उपस्थित नाहीय. म्हणजे दीपिका-रणवीर सोडून. लग्नासाठी फक्त घरातले आणि जवळचे फ्रेंड्स आहेत. सोमवारी रणवीर-दीपिकानं एकमेकांना अंगठीही घातली आणि औपचारिक साखरपुडा केला.दीपिकानं मेहंदी आर्टिस्टसमोर ठेवल्या इतक्या अटी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 14, 2018 04:15 PM IST

ताज्या बातम्या