रणवीर-दीपिकाच्या लग्नाची तारीख ठरली

रणवीर-दीपिकाच्या लग्नाची तारीख ठरली

  • Share this:

21 जून : अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्या लग्नाची तारीख अखेर ठरल्याची चर्चा आहे. हे दोघे नोव्हेंबर महिन्याच्या १० तारखेला लग्न करणार असल्याची माहिती एका मासिकाने दिलीय.

रणवीर आणि दीपिका त्यांच्या कामातून वेळ काढून लग्नाच्या तयारीला लागलेत. त्यांचं लग्न कधी होणार याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. अखेर ही तारिख नक्की असल्याची चर्चा आता सुरू झालीय. 'स्पॉटबॉय' या मासिकाने दिलेल्या वृत्तानुसार, दीपिका आणि रणवीर 10 नोव्हेंबरला लग्नबेडीत अडकणार आहे.

याआधी लग्नाची तारीख ही 19 नोव्हेंबर ठरली होती. पण त्यानंतर ही तारीख बदलण्यात आली. आता 10 नोव्हेंबरही तारीख ठरली असल्याचं सांगण्यात आलंय.

बंगळुरूमध्ये होणार लग्न

मिळालेल्या माहितीनुसार, रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोणचं लग्न हे बंगळुरूमध्ये होईल. त्यानंतर मुंबईत ग्रँड रिसेप्शन होईल असं कळतंय.

First published: June 21, 2018, 10:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading