Home /News /entertainment /

कॉमेडीयन भारतीला आणि तिच्या पतीला मोठा दिलासा, कोर्टाने दिला जामीन

कॉमेडीयन भारतीला आणि तिच्या पतीला मोठा दिलासा, कोर्टाने दिला जामीन

भारती सिंह आणि तिच्या पती हर्षची चौकशी केल्यानंतर आज दोघांनाही अंमली विरोधी पथकाने कोर्टात हजर केले होते.

    मुंबई, 23 नोव्हेंबर : ड्रग प्रकरणात (Drug Case) प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh)  आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया (Harsh Limabchiya) यांना अखेर कोर्टाने दिलासा दिला आहे. दोघांनाहीप्रत्येकी 15 हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन दिला आहे. भारती सिंह आणि तिच्या पती हर्षची चौकशी केल्यानंतर  आज दोघांनाही अंमली विरोधी पथकाने कोर्टात हजर केले होते. मुंबई मुख्य दंडाधिकाऱ्यांनी दोघांना प्रत्येकी 15 हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन दिला आहे. त्याचबरोबर चौकशी पूर्ण होईपर्यंत मुंबई बाहेर जाण्यास मनाई केली आहे. शनिवारी भारतीला अटक करण्यात आली होती. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून हर्ष लिंबाचिया याची जवळपास 18 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर भारती आणि हर्ष दोघांनाही न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. एनसीबीने केलेल्या चौकशीमध्ये दोघांनीही अंमली पदार्थांचे सेवन केल्याचे कबुल केले आहे. भारतीला एनडीपीएस अधिनियम 1986 नुसार अटक करण्यात आली आहे. भारतीचं घर आणि प्रॉडक्शन हाऊसमधून NCB नं शनिवारी सकाळी छापेमारी केली. दोन्ही ठिकाणाहून NCB च्या अधिकाऱ्यांनी 86.5 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. याशिवाय NCB ने अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा परिसरात देखील छापेमारी केली आहे. भारती सिंहच्या घरावर छापेमारीसाठी एनसीबी संपूर्ण पथकासह पोहचली होती. एनसीबीच्या इतर दोन टीम तिच्या दोन वेगवेगळ्या घरावर पोहचल्या होत्या.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या