मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

आजपासून सुरू होत आहेत सिनेमागृह! प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी हे चित्रपट सज्ज

आजपासून सुरू होत आहेत सिनेमागृह! प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी हे चित्रपट सज्ज

 सरकारची नियमावली पाळूनच आता अनलॉक सर्वत्र सुरु झाले आहे. कोरोनामुळे रिलीज होऊ न शकलेले काही चित्रपट आज प्रदर्शित होणार आहेत. परंतु चित्रपट निर्माते त्यांच्या चित्रपटांचं प्रदर्शत दिवाळीपर्यंत लांबवू शकतात.

सरकारची नियमावली पाळूनच आता अनलॉक सर्वत्र सुरु झाले आहे. कोरोनामुळे रिलीज होऊ न शकलेले काही चित्रपट आज प्रदर्शित होणार आहेत. परंतु चित्रपट निर्माते त्यांच्या चित्रपटांचं प्रदर्शत दिवाळीपर्यंत लांबवू शकतात.

सरकारची नियमावली पाळूनच आता अनलॉक सर्वत्र सुरु झाले आहे. कोरोनामुळे रिलीज होऊ न शकलेले काही चित्रपट आज प्रदर्शित होणार आहेत. परंतु चित्रपट निर्माते त्यांच्या चित्रपटांचं प्रदर्शत दिवाळीपर्यंत लांबवू शकतात.

  • Published by:  Janhavi Bhatkar
मुंबई, 15 ऑक्टोबर : कोव्हिड-19 (COVID-19) मुळे  मार्च महिन्यापासून सर्व जगभरात लॉकडाऊन सुरु आहे. हळूहळू परिस्थिती आटोक्यात येत आहे, म्हणून सरकारने अनलॉकची प्रक्रिया आता सुरु केली आहे. सरकारची नियमावली पाळूनच आता अनलॉक सर्वत्र सुरु झाले आहे. कोरोनामुळे रिलीज होऊ न शकलेले काही चित्रपट आज प्रदर्शित होणार आहेत. परंतु चित्रपट निर्माते त्यांच्या चित्रपटांचं प्रदर्शत दिवाळीपर्यंत लांबवू शकतात. कारण 15 ऑक्टोबरपासून सिनेमागृह सुरु होणार आहेत, असं सांगितलं जरी जात असलं तरीही काही निर्मात्यांना भीती वाटते आहे की, सिनेमागृहं सुरु झाली तरी लोकं तिथं येऊन सिनेमा बघतील का? चित्रपट आता थिएटरमध्ये रिलीज करण्याबाबत दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) देखील साशंक आहे. त्याला सूर्यवंशी सिनेमाबाबत कोणतीच रिस्क घ्यायची नाही. परंतु बॉलिवूड अभिनेता दिलजीत दोसांझ, मनोज वाजपेयी आणि फातिमा सना शेख यांचा 'सूरज पर मंगल भारी', कियारा आडवाणी-आदित्य सील यांचा 'इंदु की जवानी' आणि संजय लीला भन्साली यांचा सिनेमा 'ट्यूसडे अँड फ्राइडे' हे सर्व सिनेमे सिनेमागृहात प्रदर्शित होण्यास सज्ज झाले आहेत. (हे वाचा-सलमान भरतोय अभिनेत्याचे मेडिकल बिल्स, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव) निर्माता आदित्य चोप्रा यांचा बहुप्रतीक्षित सिनेमा "बंटी और बबली-2" या दिवाळीत रिलीज होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु सूर्यवंशी, 83 हे बिग बजेट चित्रुपट कधी रिलीज होतील हे अजूनही निश्चित झालेलं नाही. सूर्यवंशी सिनेमासाठी दोन पर्याय आहेत एकतर ख्रिसमस किंवा पुढल्या वर्षी 26 जानेवारी.  83 या सिनेमाची रिलीज डेट ठरलेली नाही. तो जर ख्रिसमसमध्ये प्रदर्शित झाला तर सूर्यवंशी जानेवारीपर्यंत पुढे ढकलला जाऊ शकतो.  4 डिसेंबरला "ब्रह्मास्त्र", 11 डिसेंबरला "मैदान" आणि 25 डिसेंबरला " लाल सिंग चड्ढा" प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. (हे वाचा-ड्रग्ज प्रकरणात आता विवेक ओबेरॉयच्या घरावरही धाड; पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू) अक्षय कुमारचा लक्ष्मी बाँम्ब हा Disney Plus Hotstar वर दिवाळीत प्रदर्शित होणार आहे तर Amazon वर 'छलांग' रिलीज होणार आहे. मोठ्या कलाकारांचे सिनेमे प्रदर्शित होण्याआधी प्रेक्षक कमी बजेटच्या सिनेमांना काय प्रतिसाद देतात हे पाहण्यात येणार आहे. त्यानंतर अंदाज बांधून निर्माते चित्रपटांच्या प्रदर्शनाबाबत निर्णय घेणार आहेत. दरम्यान केंद्र सरकारने आखून दिलेली नियमावली निर्मात्यांसाठी कठोर ठरत आहे.  आधीच सगळीकडे मंदी सुरु आहे. थिएटरच्या क्षमेतेहून निम्म्या लोकांनाच चित्रपट पाहून देण्याचा नियम यात आहे. त्यामुळे पैसे भरून काढण्यासाठी जर सिनेमाची तिकिटं जास्त महाग केली तर प्रेक्षक घरी बसून ओटीटीवर चित्रपट पाहतील. एकूणच कोव्हिडची भीती मनात ठेवून सिनेमागृहात लोकं सिनेमा बघायला का जातील? हा महत्त्वाचा प्रश्न देखील निर्मात्यांना सतावत आहे.
First published:

Tags: Bollywood

पुढील बातम्या