• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Video: भन्नाट डान्स करत फुलवा खामकरनं साजरा केला Mother's Day

Video: भन्नाट डान्स करत फुलवा खामकरनं साजरा केला Mother's Day

मराठमोळी कोरियोग्राफर (Choreographer) फुलवा खामकर (Fulwa Khamkar) नेहमीचं आपल्या डान्समुळे चर्चेत असते.

 • Share this:
  मुंबई, 9 मे-   मराठमोळी कोरियोग्राफर (Choreographer)  फुलवा खामकर (Fulwa Khamkar)  नेहमीचं आपल्या डान्समुळे चर्चेत असते. मात्र आजचा तिचा हा डान्स थोडासा खास आहे. कारण फुलवाने हा डान्स आपल्या लाडक्या लेकीसोबत केला आहे आहे. आज ‘मदर्स डे’ (Mother's Day)  च्या निमित्ताने शुभेच्छा देत फुलवाने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेयर केला(Video Viral) आहे. या व्हिडीओमध्ये ती आपली मुलगी आसमा(Aasma) सोबत अप्रतिम डान्स करताना दिसून येतं आहे. हा व्हिडीओला चाहत्यांकडून भरभरून दाद मिळत आहे. आज ‘मदर्स डे’ आजचा दिवस आपल्या सर्वांसाठीच खूप खास आहे. आपल्याला ज्या आईने जन्म दिला. आपल्या मायेची उब दिली. आणि आपल्याला घडवल, अशा मातृत्वाचा हा दिवस. हा दिवस प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने हा दिवस साजरा करत असतो. आज अनेक कलाकार हा दिवस आपल्या खास शैलीत सेलिब्रेट करत असतात.
  View this post on Instagram

  A post shared by PHULAWA (@phulawa)

  फुलवा खामकरने सुद्धा आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक सुंदर व्हिडीओ शेयर केला आहे. यामध्ये ती आपली मुलगी आसमा सोबत ‘पिया बोले’ या गाण्यावर उत्तम डान्स करताना दिसत आहे. यामध्ये त्या फक्त डान्सचं करत नाहीयेत. तर त्यातील प्रत्येक स्टेप दोघी मिळून एन्जॉय करत आहेत. आई आणि लेकीमधील घट्ट नात यातून स्पष्ट दिसत आहे. या व्हिडीओला चाहते मोठ्या प्रमाणात पसंत करत आहेत. आणि छान छान कमेंट सुद्धा करत आहेत. (हे वाचा:का करते मेकअपला विरोध?; साई पल्लवीनं सांगितलं ‘No Make-Up’ निर्णयाचं कारण  ) फुलवा मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये एक उत्तम कोरियोग्राफर म्हणून ओळखली जाते. फुलवा सोनी टीव्ही वरील ‘बूगी वूगी’ या डान्स शोची विजेती होती. हा पहिला भारतीय रिएलिटी शो होता. तसेच फुलवाने अनेक डान्सशो केले आहेत. त्याचं बरोबर ती एका मराठी डान्स शो ‘एका पेक्षा एक’ ची परीक्षक सुद्धा होती. (हे वाचा:Mother's Day: पाहा बॉलिवूडच्या Yoga Mother; हेल्दी लाइफस्टाइलमुळं असतात चर्चेत  ) फुलवाने नटरंग, फोटोकॉपी, सांगते ऐका, मितवा यांसारख्या अनेकमराठी चित्रपटांत कोरियोग्राफी केली आहे. तर ताल, हेपी न्यू ईयर यांसारख्या हिंदी चित्रपटातही कोरियोग्राफी केली आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: