मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

"ओव्हर स्मार्ट बनू नका", सुशांतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा'बाबत चेतन भगतचा इशारा

"ओव्हर स्मार्ट बनू नका", सुशांतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा'बाबत चेतन भगतचा इशारा

सुशांत सिंह राजपूतचा (sushant singh rajput) दिल बेचारा (dil bechara) 24 जुलैला ऑनलाइन रिलीज होणार आहे.

सुशांत सिंह राजपूतचा (sushant singh rajput) दिल बेचारा (dil bechara) 24 जुलैला ऑनलाइन रिलीज होणार आहे.

सुशांत सिंह राजपूतचा (sushant singh rajput) दिल बेचारा (dil bechara) 24 जुलैला ऑनलाइन रिलीज होणार आहे.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 21 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा (sushant sing rajput) शेवटचा चित्रपट दिल बेचारा (Dil Bechara) 24 जुलैला रिलीज होणार आहे. चित्रपट रिलीज होण्याच्या काही दिवस आधीच लेखक चेतन भगतने (Chetan Bhagat) चित्रपट समीक्षकांना इशारा दिला आहे. ओव्हर स्मार्ट बनून चित्रपटाबाबत काहीही वायफळ लिहू नका, असं चेतन भगतने म्हटलं आहे.

सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलीवूडमधील नेपोटिझमवरून चर्चा सुरू झाली. चेतन भगतनेदेखील याबाबत आपली प्रतिक्रिया दिली होती. दरम्यान आता त्याने सुशांतचा चित्रपट दिल बेचाराबाबत भाष्य केलं आहे. या चित्रपटाचं समीक्षण करणाऱ्यांना इशारा आणि सल्लाही दिला आहे.

चेतन भगतने ट्वीट केलं आहे, सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट या आठवड्यात रिलीज होणार आहे. सर्व समीक्षकांनी तटस्थपणे चित्रपटाबाबत लिहावं. ओव्हर स्मार्ट होऊन नका, वायफळ गोष्टी लिहू नका, निष्पक्ष आणि संवेदनशील बना. नको त्या पद्धतींचा वापर करू नका. तुम्ही असे कित्येक आयुष्य उद्भवस्त केले आहेत. आता तरी थांबा. आम्ही लोक पाहत आहोत.

हे वाचा - संगीतकार ए. आर. रेहमानसह दिग्गज गायक सुशांतला देणार म्युझिकल ट्रिब्युट

पवित्र रिश्ता या मालिकेतून सुशांत घराघरात पोहोचला. या छोट्या पडद्यावरील भूमिकेनंतर मोठ्या पडद्यावरही त्याने स्वत:ला सिद्ध करून दाखवलं.  ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या. त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं होतं. 'दिल बेचारा' हा त्याचा शेवटचा चित्रपट आहे.

हे वाचा - 'मी या नवीन कंगनाला ओळखत नाही',असं काय झालं की अनुराग कश्यपने कंगनाला फटकारलं?

24 जुलैला डिज्नी प्लस हॉटस्टारवर (Disney Hotstar ) हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट सर्वांना पाहता येणार आहे. म्हणजे हा फक्त सस्क्राइबरच नाही तर नॉन सस्‍क्राइबर प्रेक्षकांनाही ही फिल्म पाहता येणार आहे. ज्यांच्याकडे डिज्नी प्लस हॉटस्टारचं सब्सक्रिप्शन नाही, त्यांनाही हा चित्रपट पाहता येणार आहे. प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर आणि सुशांतचे मित्र मुकेश छाबडा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात सुशांतसह अभिनेत्री संजना सांघी आहे. संजनाचा हा पहिला चित्रपट आहे.

First published:

Tags: Sushant Singh Rajput