मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

"विधु विनोद चोप्राने मला आत्महत्येच्या जवळ पोहोचवलं होतं", चेतन भगतचा खळबळजनक आरोप

"विधु विनोद चोप्राने मला आत्महत्येच्या जवळ पोहोचवलं होतं", चेतन भगतचा खळबळजनक आरोप

विधु विनोद चोप्राची (vidhu vinod chopra) पत्नीने केलेल्या ट्वीटला उत्तर देताना चेतन भगतने (chetan bhagat) त्याच्यावर निशाणा साधला आहे.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 21 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput) आत्महत्येनंतर प्रतिक्रिया देणाऱ्या लेखक चेतन भगतने (chetan bhagat) आपल्याला दिग्दर्शकाने आत्महत्येच्या जवळ पोहोचवलं होतं, असा धक्कादायक खुलासा केला आहे. विधु विनोद चोप्रावर (vidhu vinod chopra) त्याने खळबळजनक आरोप केला आहे. विधु विनोद चोप्राची पत्नी आणि फिल्म समीक्षक अनुपमा चोप्राला उत्तर देताना चेतनने त्याच्यावर निशाणा साधला आहे.

सुशांतचा शेवटचा चित्रपट दिल बेचारा 24 जुलैला रिलीज होणार आहे. या चित्रपटाचं समीक्षण संवेदनशील होऊन करा, ओव्हर स्मार्ट बनण्याची गरज नाही, असा सल्ला चेतन भगतने ट्वीटवर समीक्षकांना दिला. चेतन भगतच्या या ट्वीटर समीक्षक अनुपमा चोप्राने प्रतिक्रिया दिली.

अनुपमा म्हणाली, "प्रत्येकी वेळी तुम्ही विचार करता की व्यक्तीचा विचार यापेक्षा खालच्या पातळीवर नाही जाऊ शकत, मात्र तो जातो"

हे वाचा - "ओव्हर स्मार्ट बनू नका", सुशांतचा शेवटचा चित्रपट दिल बेचाराबाबत चेतन भगतचा इशारा

अनुपमाच्या प्रतिक्रियेनंतर चेतन भडकला आणि त्याने थेट अनुपमाचे पती विधु विनोद चोप्रावर आपल्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोपही लावला.

चेतन म्हणाला, "जेव्हा तुमच्या पतीने मला सर्वांसमोर धमकी दिली आणि लाज न बाळगता माझं सर्व क्रेडिट घेतलं होतं. माझ्या स्टोरीचं क्रेडिटही मला देण्यास नकार दिला आणि मला आत्महत्येच्या जवळ नेलं होतं. त्यावेळी तुम्ही फक्त तमाशा पाहत राहिलात. त्यावेळी तुमची विचार करण्याची पातळी कुठे होती"

First published: