'या' बॉलिवूड सेलिब्रेटींनी घटस्फोटानंतर लगेचच दुसऱ्यांदा बांधली लगीनगाठ!

बॉलिवूड कलाकार जेवढ्या धामधुमीत लग्न करतात तेवढ्याच समजूतदारपणे ते नात्यात दुरावा आल्यावर वेगळेसुद्धा होतात.

  • Share this:

बॉलिवूडमध्ये लग्न आणि घटस्फोट ही गोष्ट सामान्य आहे. बॉलिवूड कलाकार जेवढ्या धामधुमीत लग्न करतात तेवढ्याच समजूतदारपणे ते नात्यात दुरावा आल्यावर वेगळेसुद्धा होतात. असेच काही टीव्ही आणि बॉलिवूड कलाकार ज्यांनी घटस्फोट झाल्यावर लगेच दुसरं लग्न करून नवा संसार सुरू केला. काहींनी तर घटस्फोट घेतल्यावर जास्त वेळ न घालवता काही महिन्यांतच लग्न केलं...

एमटीव्ही रोडिस फेम अभिनेता रघु रामनं पहिली पत्नी सुगंधाशी घटस्फोट घेतल्यावर दुसरी लाइफ पार्टनर शोधण्यास उशीर केला नाही. रघु रामनं 2006मध्ये सुगंधाशी लग्न केलं होतं. पण 10 वर्षांनंतर हे दोघं वेगळे झाले आणि 2018मध्ये रघु रामनं दुसरं लग्न केलं. 12 डिसेंबरला त्यानं गर्लफ्रेंड नतालीशी लग्नगाठ बांधली.

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि अभिनेता हिमेश रेशमियानं आपली पहिली पत्नी कोमलला घटस्फोट देत मे 2018मध्ये गर्लफ्रेंड सोनिया कपूरशी लग्न केलं. कोमल आणि हिमेशनं 1995मध्ये लग्न केलं होतं पण 2017मध्ये ते दोघं एकमेकांपासून वेगळे झाले.

'वीरे द वेडिंग' मध्ये अभिनेत्री करिना कपूर सोबत लीड रोडमध्ये दिसलेल्या सुमित व्यासनं आपली पत्नी शिवानी टांकसाळेला 2018मध्ये घटस्फोट दिल्यानंतर 6 महिन्याच्या आतच अभिनेत्री एकता कौलशी लग्न केलं.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री बिपाशा बासू आणि टीव्ही अभिनेता करण सिंह ग्रोवर एप्रिल 2016मध्ये लग्नाच्या बेडीत अडकले. मात्र करणनं सर्वात आधी श्रद्धा निगम आणि त्यानंतर जेनिफर विंगेट सोबत लग्न केलं होतं मात्र त्याची ही दोन्ही लग्न जास्त काळ टिकू शकली नाहीत. त्यानंतर त्यानं बिपाशाशी लग्न केलं. लग्नाअधी बिपाशा आणि करण यांनी 'अलोन' या सिनेमात एकत्र काम केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Bollywood
First Published: Jan 6, 2020 08:05 AM IST

ताज्या बातम्या