'हे' बॉलिवूड सेलिब्रिटी आहेत ब्रँडेड घड्याळांचे शौकीन, किंमत ऐकून व्हाल थक्क

'हे' बॉलिवूड सेलिब्रिटी आहेत ब्रँडेड घड्याळांचे शौकीन, किंमत ऐकून व्हाल थक्क

AudemarsPiguet हा इमरानचा आवडता ब्रँड आहे. 2.1 कोटी रुपये एवढी या घड्याळाची किंमत आहे.

  • Share this:

लक्झरी घडाळ्यांच्या बाबतीत आपले बॉलिवूड सेलिब्रेटीही मागे नाहीत. रोलेक्स पासून ओमेगा पर्यंत ब्रँडेड घड्याळं वापरणाऱ्यांच्या यादीत अनेक बॉलिवूडकरांचा समावेश आहे. पण काही असे बॉलिवूडकर ज्यांना ब्रँडेड घडाळ्यांचं एवढं वेड आहे की त्यांना त्याची किंमत महत्वाची वाटत नाही. बॉलिवूडच्या या पाच सेलिब्रेटींच्या घडाळ्यांची किंमत ऐकून तुम्ही तोंडात बोटं घालाल. जाणून घेऊया कोण आहेत हे सेलिब्रेटी...

लक्झरी घडाळ्यांच्या बाबतीत आपले बॉलिवूड सेलिब्रिटीही मागे नाहीत. रोलेक्स पासून ओमेगापर्यंत ब्रँडेड घड्याळं वापरणाऱ्यांच्या यादीत अनेक बॉलिवूडकरांचा समावेश आहे. पण काही असे बॉलिवूडकर ज्यांना ब्रँडेड घड्याळांचं एवढं वेड आहे की त्यांना त्यांची किंमत महत्त्वाची वाटत नाही. बॉलिवूडच्या या पाच सेलिब्रिटींच्या घड्याळांची किंमत ऐकून तुम्ही तोंडात बोटं घालाल. जाणून घेऊया कोण आहेत हे सेलिब्रिटी...

महागडी आणि ब्रँडेड घड्याळ वापरणाऱ्यांच्या यादीत अभिनेता इमरान हाश्मीचं नाव सर्वात अगोदर घेतलं जातं. इमरानला ब्रँडेड घड्याळांचं भयंकर वेड आहे. त्यांच्याकडे अनेक ब्रँडेड घड्याळ आहेत. मात्र Audemars Piguet हा इमरानचा आवडता ब्रँड आहे. या घड्याळाचे आतापर्यंत फक्त 32 पिस बनले आहेत आणि भारतात हे घड्याळ फक्त इमरान हाश्मीकडे आहे. 2.1 कोटी रुपये एवढी या घड्याळाची किंमत आहे.

महागडी आणि ब्रँडेड घड्याळं वापरणाऱ्यांच्या यादीत अभिनेता इमरान हाश्मीचं नाव सर्वात अगोदर घेतलं जातं. इमरानला ब्रँडेड घड्याळांचं भयंकर वेड आहे. त्यांच्याकडे अनेक ब्रँडेड घड्याळं आहेत. मात्र AudemarsPiguet हा इमरानचा आवडता ब्रँड आहे. या घड्याळाचे आतापर्यंत फक्त 32 पिस बनले आहेत आणि भारतात हे घड्याळ फक्त इमरान हाश्मीकडे आहे. 2.1 कोटी रुपये एवढी या घड्याळाची किंमत आहे.

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान TAG heuer या घडाळ्याच्या ब्रँडची जाहीरात करतो. शाहरुखमुळे हा ब्रँडही फेमस झाला आहे. मात्र Rolex Cosmograph हा शाहरुखचा आवडता ब्रँड आहे. तो नेहमीच व्हाइट गोल्ड डाय असलेलं Rolex Cosmograph वापरताना दिसतो. या घड्याळाची किंमत 12 लाख रुपये आहे.

सध्या बॉलिवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री दीपका पदुकोणही महागड्या आणि ब्रँडेड घड्याळांची शौकीन आहे. Tissot हा दीपिकाचा आवडता ब्रँड आहे. ती नेहमी Tissotचं 'क्लासिक प्रिंस डायमंड रोज गोल्ड वॉच' वापरते. तिच्या या घड्याळाची किंमत 8 लाख रुपये आहे.

ज्यूनिअर बच्चन अभिषेककडेही महागड्या घड्याळांचं कलेक्शन आहे. सध्या तो Seamaster 300 omega master हे घड्याळ वापरतो. या घड्याळाची किंमत जळपास साडेसात लाख रुपये आहे.

ज्यूनिअर बच्चन अभिषेककडेही महागड्या घड्याळांचं कलेक्शन आहे. सध्या तो Seamaster 300 omega master हे घड्याळ वापरतो. या घड्याळाची किंमत जळपास साडेसात लाख रुपये आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 3, 2019 10:04 PM IST

ताज्या बातम्या