मुंबई, 14 मार्च : बाॅलिवूडची हाॅट अभिनेत्री 37 वर्षांची आहे. पण तिच्याकडे पाहिलं तर अजिबातच तसं वाटत नाही. आपली फिगर चांगली राहण्यासाठी सनी नियमित व्यायाम करते. ती पाय मजबूत राहण्यासाठी नियमित सायकलिंग करते.
सनी रोज सकाळी उठून अर्धा तास वाॅक घेते. यामुळे दिवसभर ती प्रसन्न, उत्साही राहू शकते असं तिचं म्हणणं आहे.
सनीला रोज जिमला जायला वेळ नसतो. म्हणून ती घरीच योग करते. सनी म्हणते, योग केल्यानं सगळी थकावट दूर होते. याचाच व्हिडिओ तिनं इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.
शरीरातले फॅट्स काढून टाकण्यासाठी सनी रोज स्क्वॅश खेळते. यामुळे तिच्या पोटातल्या पेशींना व्यायाम होतो.
#FitnessFunda : जिमबरोबर 'याला'ही अजय देवगण देतो महत्त्व
बॅटिंग नाही तर 'या' खास कारणासाठी सनी लिओनला आवडतो धोनी
आपल्या आहारात सनी लिओन अॅटिआॅक्सिडंट डाएट घेते. प्रोटिन्सही ती भरपूर घेते. सनीला ब्लॅक काॅफी जास्त आवडते.
याशिवाय सनीच्या आहारात हिरव्या भाज्या आणि दूधही असतं.
सनी लिओन सिनेमात नेहमीच हाॅट आणि ग्लॅमरस दिसते. पण हे काही सहज येत नाही. सनीही आपले वर्कआऊट आणि डाएट याकडे जास्त लक्ष देते.