‘आज आपण खरा हिरो गमावला’; मिल्खा सिंग यांच्या निधनामुळं बॉलिवूड शोकसागरात

पद्मश्री मिल्खा सिंग यांच्या निधानावर बॉलिवूड सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे.

पद्मश्री मिल्खा सिंग यांच्या निधानावर बॉलिवूड सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे.

  • Share this:
    मुंबई 19 जून : ‘फ्लाइंग सिख’ नावाने प्रसिद्ध भारताने महान धावपटू मिल्खा सिंग (Milkha Singh) यांच रात्री उशीरा निधन झालं. गेल्या महिनाभरापासून ते कोरोनाने (Corona)  ग्रस्त होते. तर काहीच दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीचही कोरोनानेच निधन झालं होतं. व आता त्यांचाही कोरोनाने बळी घेतला आहे. मिल्खा सिंग यांचं नाव क्वचितच कोणी जाणत नसेल. आपल्या अफाट वेगाने त्यांनी साऱ्यांनाच मागे सोडलं होतं. मनोरंजन विश्वातूनही मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. अभिनेत्री प्रियंका चोप्रानेही (Priyanka Chopra) मिल्खा सिंग यांच्या आठवणींना उजाळा देत पोस्ट लिहिली आहे. ती लिहिते, ‘खूप स्वागत, तुम्ही आपली पहिली भेट फारच विशेष बनवली होती. मी तुमच्या श्रेष्ठतेने प्रेरित आहे. तुमच्या विनम्रतेने प्रभावित आहे. तसेच भारतासाठी तुमच्या योगदानाने प्रेरित आहे. ओम शांती मिल्खा जी, तुमच्या परिवारासाठी खूप प्रेम आणि प्रार्थना’ यानंतर अभिनेता शाहरुख खाननेही (Shahrukh Khan) मिल्खा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. फ्लाइंग सिख आता व्यक्तिशः आपल्यात नाहीत पण त्यांची जाणीव कायम होत राहील तसेच त्यांचा वारसा अपरिवर्तीत राहील. ते माझ्यासाठी प्रेरणा आहेत. लाखोंसाठी एक प्रेरणा आहेत. मिल्खा सिंग तुमच्या आत्म्याला शांतीला मिळो. यानंतर आणखीही सेलिब्रिटींनी मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे. \ तापसी पन्नू रवीना टंडन, तापसी पन्नू, मधूर भांडारकर यांनीही मिल्खा यांना श्रद्धांजली वाहिली. मिल्खा सिंग यांनी 4 वेळी सुवर्ण पदकं जिंकली होती. 1960 साली ऑलम्पिक (Olympic) मध्ये चौथं स्थानं मिळालं होतं. त्यानंतरही त्यांनी ऑलम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.
    Published by:News Digital
    First published: