प्रियांका आणि दीपिकाचं लग्न 'या' बाॅलिवूड लग्नांपेक्षा गाजणार का?

लग्न हा प्रत्येकाच्याच आयुष्यातला महत्त्वाचा क्षण. सेलिब्रिटींची लग्नं हा सर्वसामान्यांचा आवडता विषय. अशाच काही ग्लॅमरस लग्न सोहळ्यांकडे टाकू एक नजर

  • Share this:

हे वर्ष सेलिब्रिटींच्या लग्नाचं आहे. या लग्नांवरून बाॅलिवूडची काही आठवणीतली लग्न पाहा. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या लग्नाचा सोहळा असाच गाजला होता. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची प्रेमकथाही अनोखीच. करिष्माबरोबर अभिषेकचा साखरपुडा मोडला आणि ऐश्वर्याही सलमानपासून दूर झाली होती. उमराव जान, धूम 2, गुरू या सिनेमांतून दोघं जवळ आले आणि मग बाॅलिवूडचे बेस्ट कपल बनले. दोघांना लग्नानंतर आॅफ्रा विनफ्री शोमध्येही बोलावले होते.

शाहीद कपूर आणि मीरा यांच्याही लग्नाची चर्चा खूप होती. करिना कपूरबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर शाहीदनं सिनेमाशी अजिबात संबंध नसलेल्या मीराशी लग्न केलं. आज दोघंही दोन गोजिरवाण्या बाळांचे पालक बनलेत.

सैफ अली खान आणि करिना कपूर यांचं लग्न म्हणजे बाॅलिवूडमधला मोठा सोहळा होता. दोघांनी कोर्ट मॅरेजही केल आणि विधीपूर्वकही लग्न केलं. शाहीदशी ब्रेकअप झाल्यानंतर 2007पासून करिना आणि सैफ डेटिंग करत होते. त्यांनी लग्न 2012मध्ये केलं. धर्म, वय कसलाच फरक न मानता दोघं आनंदानं एकत्र आले.

अलिकडे गाजलेलं लग्न म्हणजे विरुष्काचं लग्न. अनुष्का आणि विराट कोहलीचं लग्न इटलीत झालं. पंजाबी पद्धतीची विदाईही यावेळी झाली. आणि नववधूप्रमाणे अनुष्का विदाईच्या वेळी भावुक झाली होती. तिनं परंपरेप्रमाणे तांदूळ मागे फेकले, पण चेहऱ्यावर माहेर सोडण्याचं दु:ख दिसत होतं.

सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांचंही लग्न गाजलं.  कपूर परिवार आणि बॉलिवूडच्या अनेक मोठ्या सेलिब्रिटींच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. या वेळी सोनम लाल रंगाच्या लेहेंग्यात तर आनंद सोनेरी क्रीम रंगाच्या शेरवानीमध्ये खूपच गोड दिसत होते.  याआधी सोनमची मेहंदी, संगीत हे सोहळेही चांगलेच गाजले. बाॅलिवूडकरांनी एक कुटुंब असल्यासारखा या कार्यक्रमाचा आनंद घेतला.

नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांचं लग्नही बरेच दिवस चर्चेत होतं.  नेहा-अंगदने आजपर्यंत एकत्र काम केलेले नाही. पण काही कॉमन फ्रेन्ड्सच्या माध्यमातून त्यांची भेट झाल्याचे कळते. अंगद हा अमिताभ बच्चन यांच्यासोबत पिंकमध्ये दिसला होता. त्यानंतर आलिया भट्ट आणि शाहरुख खानच्या डिअर जिंदगीमध्ये सुद्धा अंगद होता.

आता सगळ्यांचं लक्ष आहे 2 डिसेंबरकडे. जोधपूरमध्ये प्रियांका चोप्रा आणि निकचं लग्न आहे. लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. तसंच हा लग्नसोहळा 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरदरम्यान पार पडणार आहे.जोधपूर इथं दोघांनीही जाऊन हे लग्नस्थळ निश्चित केलंय.

दीपिका आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाचा बार दिवाळीनंतर उडणार आहे. दीपिकानं ट्विट करून लग्नाची तारीख सांगितलीय. 14 आणि 15 नोव्हेंबरला दोघांचं लग्न होणार आहे. प्रियांकाप्रमाणेच दीपिका रणवीरच्या लग्नाची चर्चाही बरीच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 22, 2018 02:09 PM IST

ताज्या बातम्या